शोरूममधील घड्याळांचे काटे नेहमी 10.10 ची वेळ का दर्शवतात? काय आहे यामागील सत्य जाणून घ्या
घड्याळ ( Photo- Twitter)

तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, जगभरातील शोरूम किंवा जाहिरातींमध्ये दाखवलेल्या घड्याळ्यातील वेळ नेहमी 10 वाजून 10 मिनिटे म्हणजेच 10:10 अशीच दाखवलेली असते. या संदर्भात अनेक काल्पनिक कथा प्रचलित आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत या मागील तथ्य काय आहे आणि ही वेळ का दाखवली जाते. (आपल्या कपाळावरील Eyebrows फक्त सुंदरता वाढवण्यासाठी आहेत का? विचार करा जर आपल्याला भुवया नसत्या तर काय झाले असते?)

* जगप्रसिद्ध टाइमेक्स (Timex) आणि रोलेक्स (Rolex) ची घडयाळे सुरुवातीला शोरूममध्ये ठेवली जायची तेव्हा त्यात 8.20 अशी वेळ दाखवली जायची. जेणेकरून ग्राहकांना वर नमूद केलेल्या घड्याळांच्या निर्मात्याचे नाव सहज दिसू शकेल. पण नंतर काट्यांची दिशा बदलली गेली, कारण घड्याळ बनवणाऱ्यांना 8.20 च्या वेळी दुःखाची भावना दिसत असे, जे नकारात्मकतेचे लक्षण मानले जात असे. म्हणून त्यांनी दुःखाची भावना आनंदामध्ये दाखवण्यासाठी 10.10 ची वेळ ठेवली, जे स्मितहास्यासारखे दिसते . असे म्हटले जाते की लोकांनी ही ते अर्थपूर्ण मार्गाने स्वीकारले.

* आणखी एका समजानुसार, अमेरिकेने रात्री 10.10 वाजता जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा शहरांवर अणुहल्ला केला, ज्यामध्ये लाखो लोक मारले गेले. असे म्हटले जाते की त्याच्या आठवणीत आणि देवाचे स्मरण करुन घड्याळाचे काटे 10.10 वर ठेवण्यात येतात.

* अशीही एक धारणा आहे की 12 क्रमांकाच्या खाली निर्मात्याचे नाव लिहिलेले असते , दोन्ही हातांचे प्रतीक म्हणून घड्याळाचे काटे असे सूचित करतात की दोन्ही हातात (घड्याळाचे काटे ) घड्याळाने निर्मात्यांचे नाव घेतलेले आहे.

* या संदर्भात, असेही म्हटले जाते की घड्याळाच्या दुकानात प्रदर्शनासाठी ठेवलेल्या घड्याळांमध्ये दाखवलेली वेळ हसणारी प्रतिमा दर्शवते, जी सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक देखील मानली जाते.

* 10.:10 वर काटे दाखवण्यामागे एक आध्यात्मिक संकेत देखील आहे की ती वेळ देवाकडे प्रार्थना करण्याचा एक मार्ग आहे की - प्रभु, प्रत्येकाची वेळ चांगली आणि आनंदी ठेवा.

* काही लोक 10.10 च्या वेळेला इंग्रजीचे 'व्ही' अक्षर 'व्ही फॉर व्हिक्टरी' मानतात.

* अशाप्रकारे, शोरूममध्ये लावण्यात आलेल्या घड्याळांमध्ये 10.10 वाजवण्यामागे सर्व प्रकारचे तर्क वितर्क प्रचलित आहेत, परंतु कोणताही युक्तिवाद अस्सल नाही. याला घड्याळ कंपन्यांची बिजनेस स्ट्रॅटेजीच म्हटले पाहिजे.