आपल्या कपाळावरील Eyebrows फक्त सुंदरता वाढवण्यासाठी आहेत का? विचार करा जर आपल्याला भुवया नसत्या तर काय झाले असते?
Eyebrow (Photo Credits: Pixabay)

देवाने मनुष्याला अतिशय विचारपूर्वक तयार केले आहे. शरीराच्या प्रत्येक अंतर्गत किंवा बाह्य भागाचा शरीराच्या इतर भागाशी किंवा संपूर्ण शरीराशी एक प्रकारचा संबंध असणे आवश्यक आहे. आज आपण या विषयावर चर्चा करूया की, आपल्या डोळ्याच्या वरच्या भागात जाड भुवया का आहेत? त्यांची भूमिका काय आहे. (Vastu Tips for Money Plant: कोणत्या दिशेला मनी प्लांटचे झाड लावावे? जेणेकरुन घरात येईल सुख-समृद्धी )

काय सांगते समुद्र शास्त्र

समुद्रशास्त्रानुसार, भुवया बघून मानवी स्वभावाबद्दल बरेच काही जाणून घेता येते. फिजिओलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार डोळे आणि भुवयात बरेच भेद आहेत. कोणीही हे नाकारू शकत नाही की भुवया आपल्या मनात काय चालले आहेत हे प्रकट करतात. सौंदर्य तज्ञ वेगवेगळ्या प्रकारच्या डोळ्याच्या भुवयांचे वेगवेगळे अर्थ सांगत असतात. पण, हे देखील खरं आहे की भुवया आपल्या सौंदर्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

जर खरच भुवया नसत्या तर आपले आयुष्य कमी झाले असते?

आपल्या डोळ्यांच्या वरच्या भागाचे कार्य काय आहे? किंवा जर या भुवया नसत्या तर? भुवया आपले सौंदर्य वाढवतात का ? कदाचित हो पण आणि कदाचित नाही पण , कारण डोळ्यांच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवला गेला तर या भुवयांचे अजूनही काही फायदे आहेत.उदाहरणार्थ, जर डोळ्यांच्या वर भुवया नसतील तर आपली दृष्टी वेळेच्या आधी जाऊ शकते. कारण आपल्या कपाळाच्या वर ज्या भुवया आहेत त्या बाहेरून येणारी कोणतीही गोष्ट आपल्या डोळ्यात जाण्यापासून प्रतिबंधित करतात.भुवयांमुळेच आपल्या शरीरावरुन वाहणारे पावसाचे पाणी किंवा घाम थेट आपल्या डोळ्यांमध्ये जाऊ शकत नाही. कारण असे झाल्यास आपल्या डोळ्यांत जळजळ होऊ शकते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर आपल्या डोळ्यांच्या वर भुवया नसत्या तर आपल्या पापण्यांचे केस आता आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असले असते आणि मनुष्याचे डोके पुढे झुकलेले असते. सध्या काही तज्ञांचे शरीरात भुवयांच्या भूमिकेबाबत संशोधन चालू आहे.