जेव्हा आपण घराला नवे रुप देण्याचा विचार करतो त्यावेळी त्यासाठी आपली बहुतांश सेविंग्स किंवा आपल्या भावना त्यामध्ये समाविष्ठ करतो. एखादे घर तयार करताना सर्वाधिक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली जाते ती म्हणचे घराची वास्तू. कारण घराच्या वास्तूमध्ये काही उणीवा असल्यास त्याचे तुमच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडण्यासह एक नकारात्मक उर्जा सुद्धा घरात निर्माण होऊ शकते. ही गोष्ट फक्त एकट्या व्यक्तीपूर्तीच मर्यादित राहत नाही तर घरातील अन्य मंडळींवर सुद्धा घराच्या वास्तूचा प्रभाव पडतो. याच बद्दल आम्ही आज तुम्हाला अधिक सांगणार आहोत की, घराचा दरवाजाची कोणती योग्य दिशा आहे. तसेच कोणत्या दिशेला तुमच्या घराचा दरवाजा असला पाहिजे. ही बाब वास्तुमध्ये फार महत्वाची मानली जाते. तर जाणून घ्या त्याबद्दल अधिक माहिती.
जर तुमच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला असेल तर तो सर्वाधिक शुभ मानला जातो. व्यावहारिक दृष्ट्या या दिशेला असणारा मुख्य दरवाजा सर्वाधिक उत्तम असल्याचे म्हटले जाते. कारण या दिशेने सूर्य उगवत असल्याने तुमच्या घरात त्याचा पुरेसा प्रकाश ही मिळतो. तसेच ही दिशा आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत खास मानली जाते. वास्तुनुसार पूर्व दिशेला असणारा दरवाजा अत्यंत योग्य असल्याचे मानले जाते.
वास्तु मध्ये उत्तर दिशेला देव दिशा मानले जाते. या दिशेला वास्तुच्या मते सर्वाधिक शुभ असल्याचे म्हणतात. उत्तर दिशेला सुद्धा घराचा दरवाजा असणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते. त्यानुसार तुम्हाला दूरचे प्रवास करण्याची संधी मिळू शकते आणि ही गोष्ट फलदायी मानली जाते. या दिशेला मुख्य दरवाजा असेल तर तुमच्या मनात आध्यात्मिक विचार येतात.
तसेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर ते सुद्धा शुभ असते. त्यानुसार घरातील मंडळींना आयुष्यात यशाच्या शिखराकडे जाण्यास थोडा वेळ लागतो पण मिळालेले यश हे सर्वोच्च असते. अशा लोकांना धोका सुद्धा कमी संभवतो.(सूर्यास्तानंतर महिलांनी अजिबात करू नये 'या' चुका; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान)
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे घराचा दरवाजा कधीच दक्षिण दिशेला नसला पाहिजे. कारण ही दिशा यमाची मानली जाते. या दिशेला मुख्य दरवाजा असल्यास मालकाला नेहमीच दु:ख भोगावे लागतेच त्याचसोबत पत्नीला सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो. या व्यतिरिक्त घरातील मंडळींना मृत्यू धोका संभवतो असे मानले जाते किंवा काहीजण मृत्यूच्या दारातून परत येतात. दक्षिण दिशेने पितरांचे आगमन होत असल्यानेच ही दिशा अशुभ मानली जाते. यामुळेच दक्षिण दिशेला असलेला दरवाजा कधीच शुभ मानला जात नाही.