सनातन धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व दिले जाते. यावर्षी हा पवित्र महिना 25 जुलैपासून (रविवार) सुरू होत आहे. त्यानुसार श्रावणचा पहिला सोमवार 26 जुलै रोजी पडणार आहे. श्रावण महिना 22 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. या महिन्यात चार सोमवार असतील. या महिन्यातील सोमवारी भगवान शिव यांची विशेष पूजा आणि विधी केली जाते. सोमवार हा दिवस भगवान शिव यांना समर्पित असल्याने श्रावणात येणारा प्रत्येक सोमवार हा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी विवाहित महिला आपल्या वैवाहिक जीवनाचे रक्षण आणि आरोग्यासाठी भगवान शिवच्या नावाने उपवास ठेवतात. तर, या महिन्याताली शिवरात्री, जलाभिषेकसह अनेक महत्वाची गोष्टी जाणून घेऊया.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये श्रावण महिन्याच्या विशेष महत्त्वचा उल्लेख आहे. या महिन्यात शिवभक्त भगवान शिवची पूजा करतात आणि विधी करतात. काही लोक सोमवारी उपवास ठेवतात आणि काही लोक या संपूर्ण महिन्यासाठी उपवास ठेवतात. भगवान शिव आपल्या भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास आशीर्वाद देतात, असे मानले जाते. हा उपवास विवाहित महिलांसह अविवाहित मुलीदेखील ठेवतात. हे देखील वाचा- Mahakavi Kalidas Din 2021: यंदा महाकवी कालिदास दिन 11 जुलै दिवशी; जाणून घ्या या महान साहित्यकारा विषयी खास गोष्टी!
श्रावण महिन्यातील सोमवार कधी आहेत?
पहिला सोमवारः 26 जुलै 2021
दुसरा सोमवार: 02 ऑगस्ट 2021
तिसरा सोमवार: 09 ऑगस्ट 2021
चौथा सोमवारः 16 ऑगस्ट 2021
श्रावण महिन्यातील शिवरात्री कधी आहे?
हिंदू कॅलेंडरमध्ये, प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला शिवरात्र पडते, काही ठिकाणी त्याला श्रावणी शिवरात्रि देखील म्हटले जाते. या महिन्यातील शिवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी व्रत करून आणि भगवान शिव यांची पूजा केल्यास सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि जीवनात आनंद आणि भरभराट होते. चातुर्मासात भगवान शिव पृथ्वीला भेट देतात आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करतात, असे मानले जाते. या महिन्यातील शिवरात्र 6 ऑगस्टला येत आहे.
श्रावण शिवरात्रीच्या पूजेसाठी शुभ वेळ-
निशिता काळ पूजा मुहूर्ता: 7 ऑगस्ट (शनिवार) 2021,
सकाळी 12.06 ते 12.48
पारण मुहूर्त: 7 ऑगस्ट रोजी सकाळी 05.46 ते दुपारी 03.45
सावनमधील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी-
06 ऑगस्ट 2021, शुक्रवारी संध्याकाळी 06.28 वा. चतुर्दशीला प्रारंभ होईल.
तर, 07 ऑगस्ट 2021 रोजी शनिवारी रात्री 07.11 वा चतुर्दशी संपणार आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात श्रावण पाळला जातो. तसेच सुख, शांती लाभण्यासाठी भगवान शिवची पूजा केली जाते आहे.