Umbrella | Representative image (Photo Credit- Pixabay)

How to Choose the Right Umbrella: पावसाळ्यात (Rainy Season) पावसापासून बचाव करण्यासाठी विश्वासार्ह आणि प्रभावी पर्याय म्हणजे छत्री. बाजारात उपलब्ध पर्यायांचा शोध घेतला तर नानावीध रंगांच्या, आकाराच्या आणि गुणवत्तेच्या छत्र्या उलब्ध असतात. अशा वेळी आपल्याला योग्य असेल छत्री निवडणे (Stay Dry in Monsoons) अनेकदा किचकट ठरते. काहींसाठी तर ते कठीण काम असू शकते. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरुन चालताना तुम्हला जर कोरडेठाक राहायचे असेल तर तुम्हाला चांगल्या आकाराच्या आणि गुणवत्तेच्या छत्रीची गरज नक्कीच आहे. त्यामुळे इथे दिलेल्या मुद्दे तुम्हाला पावसाळ्यात चांगली छत्री निवडण्यास मदतगार ठरु शकेल.

आकार महत्त्वाचा

जेव्हा छत्रीचा विचार केला जातो तेव्हा आकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. तुम्हाला पुरेशा प्रमाणात अच्छादण्यासाठी पुरेशी रुंद छत असलेली छत्री निवडा. जी तुमच्या खांद्याच्या पसरेल. एक मोठी छत्री मुसळधार पाऊस आणि वार्‍याच्या झुळूकांपासून चांगले संरक्षण देते, तुमच्या प्रवासात तुम्हाला आरामात कोरडे ठेवते. (हेही वाचा, Viral Video: पावसात भिजत होता कुत्रा, चिमुकलीने उघडली छत्री, पहा सुंदर व्हिडिओ)

Umbrella | Representative image (Photo Credit- Pixabay)

टिकाऊपणा 

जोरदार वारा आणि मुसळधार पावसासह मान्सून काहीसा वेगवान असू शकतो. त्यामुळे छत्री निवडताना टिकाऊपणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. फायबरग्लास किंवा स्टील फ्रेम्स सारख्या मजबूत सामग्रीपासून बनवलेल्या छत्र्या निवडा. कारण तुलनेत त्या घटकांना (वारा, पावसाचा मारा, इतरांच्या छत्रीच्या काड्या यांपासून) अधिक चांगल्या प्रकारे सहन करू शकतात.

Umbrella | Representative image (Photo Credit- Pixabay)

कार्यक्षमता आणि वैशिष्ट्ये

आपल्या गरजा पूर्ण करणारी कार्यक्षमता आणि वैशिष्ट्ये विचारात घ्या. ओपन आणि क्लोज मेकॅनिझमसह एक-टच असलेल्या स्वयंचलित छत्र्या उघडझाप करण्यासाठी सोयीस्कर आहेत.

Umbrella | Representative image (Photo Credit- Pixabay)

वॉटर-रेपेलेंट फॅब्रिक्स

तुम्हाला कोरडे ठेवण्यासाठी छत्रीचे फॅब्रिक महत्वाचे आहे. पॉलिस्टर किंवा नायलॉनसारख्या जलप्रतिरोधक सामग्रीपासूनछत बनवलेल्या छत्र्या निवडा. हे कापड जलद वाळवणारे आणि प्रभावीपणे पाणी टाळणारे असते. ज्यामुळे तुमच्या छत्रीवर अनावश्यक वजन न टाकता तुम्हाला पावसापासून संरक्षण मिळते.

Umbrella | Representative image (Photo Credit- Pixabay)

आरामदायक हँडल

तुमच्या छत्रीच्या हँडलकडे दुर्लक्ष करू नका. एक मजबूत पकड प्रदान करणारे आणि आपल्या हातात आरामदायक वाटणारे हँडल निवडा. रबराइज्ड किंवा फोम हँडल ओले असतानाही सुरक्षित आणि घट्ट पकड देतात. काही छत्र्या दीर्घकाळापर्यंत वापरताना तुमच्या मनगटावरील ताण कमी करण्यासाठी धातूंपासून हँडल बनवलेल्या छत्र्या चांगल्या ठरतात.

Umbrella | Representative image (Photo Credit- Pixabay)

पावसाळ्यासाठी योग्य छत्री निवडण्यासाठी आकार, टिकाऊपणा, डिझाइन आणि कार्यक्षमता यासह विविध घटकांचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या विशिष्ट गरजा आणि वैशिष्ट्य आणि गुणवत्तेकडे लक्ष देऊन, तुम्ही योग्य छत्रीची निवड करू शकता. केवळ स्टाइलपेक्षा टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेला प्राधान्य दिलेले केव्हाही चांगले. हातात योग्य छत्री घेऊन, तुम्ही पावसाळ्याच्या ओल्या दिवसातही कोरडे आणि आरामदायी राहूनआत्मविश्वासाने वर्तन करु शकता.