सोशल मीडियावर (Social Media) एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओचे अनेकांनी कौतुक केले आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लहान मुलीमध्ये असलेली निरागसता अनेकांना भावली आहे. होय, हा व्हिडिओ आहेच तसाच एक मुलगी आपल्या वडिलांसोबत उभी आहे. हलकासा पाऊस येतो आहे. आणि तिथे एक कुत्रा आहे. या कुत्र्यासोबत ही चिमूकली जे काही करते ते पाहून अनेकांना कौतुक वाटते.लहानपणापासूनच ही मुलगी प्राणिमित्र असल्यासारखी वागताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
आपल्यापैकी अनेक लोक प्राणिमित्र असतात. ते आपापल्या परिने प्राण्यांशी मैत्री करतात. प्राण्यांना संकटातून वाचविण्यासाठी प्रयत्न करतात. अनेकदा त्याची चर्चाही होते. परंतू, लहान मुलीने दाखवलेली निरागसता ही सर्व प्राणिमिंत्रांनाही अवडेल अशीच आहे. पावसात भिजत असलेल्या या कुत्र्यावर ही मुलगी छत्री धरताना दिसते. जसे काही एखाद्या राजा किंवा राणीवर धरली जाते. तिची ही कृती पाहून उपस्थितांपैकी अनेकांनी कौतुकही केले आहे. (हेही वाचा, Viral Video: कुत्र्याला अजगराच्या विळख्यातून सोडवण्यासाठी चिमूकल्यांची धडपड, बघा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ)
ट्विट
Sweetest thing I have seen today🫶
— Tansu YEĞEN (@TansuYegen) August 10, 2022
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपणास प्रेरणा मिळते असे म्हटले आहे. सोशल मीडियावरील @TansuYegen या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हे वृत्त हिलीपर्यंत हा व्हिडिओ 519 लोकांनी Retweets तर 4,594 लोकांनी लाईक केला आहे. व्हिडिओखाली आलेल्या प्रतिक्रियाही मोठ्या मजेदार आहेत.