रस्त्यावरच्या एका भटकत्या कुत्र्याला अचानक एक भला मोठा अजगर विळखा घातल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. कुत्रा त्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतो पण त्याला ते अशक्य होतं. संबंधीत घटना चिमुकल्याच्या दृष्टीस पडता स्वतच्या जीवाची पर्वा न करता हे चिमुकले त्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. पण अजगराचा विळखा एवढा का घट्ट असतो की चिमुकल्यांना कुत्र्याच्या तावडीतून सोडवणं अशक्य होतं. तेव्हा त्यापैकी एक मुलगा धडस करत अजगराची मान आवळतो आणि दोघं त्या अजगराच्या सैल झालेल्या विळख्यातून कुत्र्याची सुटका करतात. सोशल मिडीयावर या चिमुकल्यांचा हा थरारक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)