Hotel Room | (Photo Credits: PixaBay)

उन्हाळा सुरू झाला की अनेकांना सुट्ट्यांचे वेध लागतात. कोविडच्या संकटात सध्या परदेश सहलींचे प्लॅन्स अनेकांनी गुंडाळून ठेवले आहेत पण यामुळे अनेकांचे देशात फिरण्याचे प्लॅन्स बनत आहेत.अशावेळी तुम्ही आयआरसीटीसी च्या वेबसाईटद्वारा हॉटेल बुकिंग करत असाल तर तुमच्यासाठी आता खुषखबर आहे. नुकताच IRCTC आणि फेडरेशन ऑफ हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टोरेंट असोसिएशन ऑफ इंडिया (Federation of Hotel and Restaurant Associations of India) कडून एक करार करण्यात आला आहे.

दरम्यान IRCTC आणि Federation of Hotel and Restaurant Associations of India चा करार हा हॉटेलमध्ये राहण्याच्या उत्तम सुविधांसाठी आहे. या कराराअंतर्गत एफएचआरएआई चे सदस्य आयआरसीटीसी आणि त्यांच्या सहयोगी वेबसाईट्सच्या मदतीने हॉटेलच्या खोल्यांसाठी बुकिंगसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

एका रिपोर्टनुसार, या करारामुळे थ्री स्टार आणि त्याच्या समकक्ष सुविधा देणार्‍या हॉटेलांवर आयआरसीटीसी ला दिल्या जाणार्‍या कमिशन वर 2% सूट दिली जाणार आहे. ही सूट मिळवण्यासाठी आता हॉटेल्सना एफएचआरएआई सोबत यावं लागणार आहे. यामुळे आता देशात 55 हजारांपेक्षा अधिक हॉटेल्स उपलब्ध होणार आहेत. पर्यटकांनाही त्यांच्या निवडीची अधिकाधिक हॉटेल्स निवडता येणार आहेत. ही सारी हॉटेल्स 3 स्टार आणि त्यावरील आहेत.