Junko Tabei Google Doodle: एव्हरेस्ट पार करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांच्यावर खास गूगल डूडल
Google Doodle | (Photo Credits: Google )

आजचे गूगल डूडल (Google Doodle) जुन्को ताबेई (Junko Tabei) यांना अर्पण करण्यात आले आहे. जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. जुन्को ताबेई या एक जगप्रसिद्ध गिर्यारोहक होत्या. जगातील सर्वात उंच पर्वतशिखर अशी ओळख असलेले माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) हे शिखर पार करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1939 या दिवशी झाला. त्या 16 मे 1975 मध्ये ऑल फीमेल क्लाइंबिंग पार्टी प्रमुख या नात्याने एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्या होत्या.

जुन्को ताबेई (Junko Tabei) यांनी 1992 मध्ये 'सेवन समिट्स' पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. 2016 मध्ये त्याचे निधन झाले.जुन्को यांचा जन्म मिहारु, फुकुशिमा येथे झाला. त्यांना सात बहिणी होत्या. सातपैकी त्यांचा क्रमांक पाचवा होता. लहानपणापासूनच त्यांनी गिर्यारोहणाला सुरुवात केली होती. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा गिर्यारोहक म्हणून चढाई करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपली पहिली चढाई आपल्या शिक्षकांसोबत सुरु केली होती. माउंट जवळील नासू येथून त्यांनी गिर्यारोहक म्हणून चढाईस प्रारंभ केला. ताबेई यांनी 70 पेक्षा अधिक देशांमध्यून सर्वात उंच पर्वत आणि टेकड्या पार केल्या आहेत. या टेकड्या पार करण्यातच त्यांनी आपले संपूर्ण तारुण्य व्यतीत केले. (हेही वाचा, मुंबईकर गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचा माऊंट एव्हरेस्ट उतरताना दुर्दैवी मृत्यू)

जुन्को ताबेई या विचारांनी स्त्रीवादी होत्या. त्या म्हणत असत की, जपानमधील पुरुष स्त्रीयांकडून आपेक्षा ठेवतात की त्यांनी घरात राहावे. घर चालवावे, स्वयंपाक, साफसफाई परंतू, स्त्रीयांनी त्यातून बाहेर पडले पाहिजे. पुरुषांनीही आपला द़ृष्टीकोन बदलला पाहिजे. या विचारातूनच त्यांनी लेडीज क्लाइमिंग क्लबची स्थापना केली होती. त्यांनी जेव्हा एव्हरेस्ट पार केले तेव्हा, त्यांची प्रतिक्रिया होती की, मला एव्हरेस्ट पार करणारी जगातील पहिली स्त्री म्हणून नव्हे तर एव्हरेस्ट पार करणाऱ्या 36 लोकांपैकी एक असे ओळखले जावे. एव्हरेस्ट पार केल्याबद्दल जपानचे सम्राट क्रॉउन प्रिन्स आणि राज कुमारी यांच्यासह अनेक मान्यवर लोकांनी त्यांचा सन्मान केला होता.