मुंबईकर गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचा माऊंट एव्हरेस्ट उतरताना दुर्दैवी मृत्यू
Mt Everest (Photo Credits : commons.wikimedia)

मुंबईकर गिर्यारोहक अंजली कुलकर्णी(Anjali Kulkerni) यांचा नेपाळ मध्ये माऊंट एव्हरेस्ट ( Mount Everest ) उतरताना मृत्यू झाला आहे. 55 वर्षीय अंजली यांच्यासोबत तिचे पती शरद कुळकर्णी होते. मात्र सध्या क्लायमिंग सीझनमध्ये या भागामध्ये मोठी गर्दी असल्याने गाईडला अंजलीला खाली घेऊन येण्यामध्ये उशिरा झाला. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

यंदाच्या क्लायमिंग सीझनमध्ये 13 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. यामध्ये काल अंजली कुळकर्णी आणि अमेरिकेच्या Donald Lynn Cash गिर्यारोहकाचा समावेश आहे. Thupden Sherpa ने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (22 मे) दिवशी त्यांनी चढाई पार केली. त्यानंतर उतरण्याच्या वेळेस त्यांची प्रकृती बिघडली. ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी त्या अधिक काळ राहिल्याने त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली.

हिमालयाचं ट्रेकिंग सुमारे 8,000 मीटरचं आहे. यंदा सहा परदेशी गिर्यारोहक मृत्यूमुखी पडले आहेत तर दोन जण बेपत्ता आहेत.