हिंदू धर्मात बहुतांश लोक देवाच्या समोर तेल किंवा तुपाचा दिवा लावून पूजा करतात. भारतात असे एक मंदिर आहे जिथे फक्त पाण्याचा दिवा तेवत राहतो. मात्र विश्वास ठेवणे तसे कठीणच आहे परंतु हे सत्य आहे. या मंदिरात गेल्या 50 वर्षापासून हा चमत्कार घडून येत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते.
मध्य प्रदेशातील गाडिया घाटातील देवीचे एक मंदिर आहे त्या ठिकाणी हा चमत्कार घडून येतो. कालीसिंध नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या देवीच्या मंदिरात फक्त पाण्याचा दिवा तेवत राहतो. येथील लोक असे मानतात की गेल्या 50 वर्षापासून फक्त पाण्याचा दिवा लावला जातो.(हेही वाचा-केरळ येथील मंदिरात Rum ने दुर्योधनाची 'या' कारणामुळे पूजा केली जाते)
तसेच या मागील एक कथा असून लोक असे सांगतात, येथील मंदिरातील एका पूजाऱ्याच्या स्वप्नात येऊन देवीने असे म्हटले होते की कालीसिंध नदीचे पाणी दिव्यात तेल म्हणून वापरुन त्याचा दिवा तेवत ठेव. त्याप्रमाणे पुजाऱ्याने आदल्या रात्री तो दिवा तेवत ठेवला आणि दुसऱ्या दिवशी पाहाटेला तोच पाणी असलेला दिवा विझला नसल्याचे त्याने पाहिले. तसेच येथील मंदिरात पाण्याचा दिवा लावल्यास ते पाणी तेलाचे रुप घेते असे भाविकांकडून सांगण्यात येते.
परंतु पावसाळ्यात हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते. त्यामुळे पावासाच्या दिवसात मंदिरात पूजाविधी केल्या जात नाहीत. परंतु शारदीय नवरात्रापूर्वी पुन्हा एका मंदिरात पाण्याचा दिवा लावला जातो.