Malanada Duryodhana Temple (Photo Credits-Facebook)

भारत (India) हा वैविध्यपूर्ण देश आहे. येथे विविध भाषा, संस्कृती, परंपरा पाहायला मिळतात. त्याचसोबत देवाच्या पूजेबद्दलही समाजात वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. त्याचप्रमाणे केरळ (Kerala) येथे दुर्योधनाचे (Duryodhana) मंदिर असून त्याच्याबद्दल नकारत्मक गोष्टी आजवर ऐकायला आल्या आहेत. परंतु केरळ मधील काही लोक दुर्योधनाची देव म्हणून अनोख्या पद्धतीने पूजा करतात.

कोल्लम जिल्ह्यातील एडाक्कड येथे कौरवांमधील मुख्य दुर्योधन ह्याचे एक मंदिर उभारण्यात आले आहे. पोरुवाझी पेरुविरुथि मलानाडा दुर्योधन मंदिरात लोक अनोख्या पद्धतीने त्याची पूजा करतात. या देवाला दारु सुद्धा अर्पण केली जाते. गेल्या शुक्रवार पासून येथे वार्षिकोत्सवाची सुरुवात झाली असून भाविकांनी ओल्ड मॉन्क दारुच्या 101 बॉटल्स खरेदी करुन त्या देवासमोर ठेवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.(हेही वाचा-Shimga Festival 2019: कोकणातील होळी सण, पालखी नाचवणं, दशावतार यांनी आठवडाभर रंगतो शिमगोत्सव!)

यापाठी एक पौराणिक कथा आहे. असे मानले जाते की, दुर्योधन एकदा या गावात पाण्यासाठी तरसलेला होता. त्यावेळी एका घरात जाऊन त्याने पाणी मागितल्यावर त्याला ताडी देण्यात आली. या ताडीचा स्वाद त्याला खुप आवडला. म्हणून येथील लोक असे मानतात की दुर्योधनाला दारु दिल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात.

TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, मंदिराचे सचिव एसबी जगदीश यांनी सांगितले की मंदिरात ताडी आणि दारु देवाला अर्पण केली जाते. त्याचसोबत पान, चिकन, बकरी, सिल्कचे कपडे सुद्धा देवाला दिले जातात. तसेच येथे सर्व धर्मातील लोक पूजा करत असून काही भाविक दुर्योधनाला अप्पोपन या नावाने संबोधतात. तर विदेश पर्यटक येथे आल्यावर विविध प्रकारची दारु देवाला अर्पण करतात.