सेक्समध्ये पार्टनरला आनंद देण्यासाठी काही टिप्स; कारण 'या' अपेक्षा मुली कधीच बोलून दाखवत नाहीत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: stokpic/pixabay)

सेक्स (Sex) ही अनुभवातून बहरत जाणारी प्रक्रिया आहे. हळू हळू तुमच्या पार्टनरला काय आवडते हे उलगडत जाते आणि कालांतराने पार्टनरच्या आवडीनिवडी ध्यानात घेतल्या जातात. ठरवून केलेल्या लग्नात तर संपूर्ण सेक्समध्ये दोघांच्याही आनंदाची परमोच्च पातळी गाठण्यास वेळ लागतो. अशावेळी आपल्या पार्टनरला विशेषतः महिलांना सेक्समध्ये काय आवडते हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. तुमचे संसारिक जीवन हे बऱ्याच अंशी सेक्सवरदेखील अवलंबून असते, म्हणूनच चांगला सेक्स तुमच्या पार्टनरला खुश ठेऊ शकतो. सेक्स ही दोघांनी मिळून करायची एक शारीरिक क्रिया आहे, ज्या क्रियेमध्ये मन हे तितक्याच आवेगाने प्रभावित होते. म्हणूनच या क्रियेमध्ये एकमेकांचा, एकमेकांच्या आवडी-निवडींचा विचार करणे हे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक महिलेला हेच आवडते हे सांगणे अवघड आहे. यासाठी महिलांना काय काय आवडू शकते हे ध्यानात घेतले पाहिजे.

> सेक्समध्ये ‘स्पर्श’ हा फार महत्वाची भूमिका बजावतो. स्त्रिया स्पर्शाने उत्तेजित होतात, तसेच त्यांना अराऊज करणारा गंधही आवडतो. काही महिलांना पुरुषांना डॉमिनंट करायला आवडते तर काहींना बीडीएसएम मधील काही गोष्टी आवडतात. या गोष्टी अनुभवातून जाणून घ्या किंवा मनमोकळेपणाने बोला.

> आपल्या मर्जीविरुद्ध, आणि फक्त आपल्या जोडीदाराला इच्छा झाली म्हणून प्रणयाची बळजबरी मुलींना कधीच आवडत नाही. त्यामुळे सुरुवात करताना आधी स्त्रीला काय हवे आहे, तिला काय आवडते अशा गोष्टीं करण्यापासून सुरुवात करा.

> महिलांना रोमँटीक वातावरणात सेक्स करायला आवडतो. कँडल, गुलाबाच्या पाकळ्या, संगीत, दरवळणारा गंध अशा वातावरणात महिला जास्त उत्तेजित होतात.

> त्यानंतर महत्वाचा आहे संवाद. स्रीच्या शरीराला हळुवारपणे स्पर्श करणे, तिला सुरक्षिततेची जाणीव करून देणारा अन तुमचा सहवास सुखाचा वाटेल असा संवाद साधणे हे फार महत्वाचे आहे.

> प्रत्येक स्रीला तिची स्वतःची स्पर्शस्थानके असतात ज्यांच्याशी खेळल्यास तिला उत्तेजित वाटते, जसे खुपश्या स्त्रीयांना मानेच्या पाठीमागे हळुवार किस केल्यास एका वेगळ्या अनुभवाची प्राप्ती होते तर काही स्रियांना त्यांच्या बेम्बीशी खेळलेले आवडते. त्यामुळे तुमच्या पार्टनरच्या अशा जागा शोधून काढून त्यांच्यापासून सुरुवात करा.

> संभोगापूर्वी फोरप्लेला महत्व द्या. पुरेसा फोरप्ले झाल्यावर मुख्य कृतीकडे वळा. याचवेळी स्त्रियांच्या आवडत्या पोझिशन्स लक्षात घ्या आणि तसाच प्रयत्न करा. (हेही वाचा : लग्नानंतर सेक्सपेक्षाही जास्त महत्वाच्या आहेत या 5 गोष्टी)

> सेक्सच्या वेळेस जर अर्धवट सेक्स केल्यास महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही संतुष्ट झाला तरी, तुमच्या महिला पार्टनरला स्पर्शातून आनंद देत राहा.

शरीर अन मन या दोन्ही गोष्टी जुळवण्याच काम प्रणय करतो. अर्थात या शारीरिक क्रियेमुळे मानसिक तणाव कमी होतो. मनात आपल्या अत्यंत जवळचे कोणतीरी असल्याच्या भावनेने माणसाला सुरक्षित वाटते. त्यामुळे सेक्समध्ये घाई न करता, प्रत्येक क्षणाचा अनुभव तुम्हीही घ्या आणि जोडीदारालाही घेऊ द्या.