लग्नानंतर सेक्सपेक्षाही जास्त महत्वाच्या आहेत या 5 गोष्टी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

लग्न फक्त दोन व्यक्तींमध्येच होत नाही तर, दोन कुटुंबामध्ये होते. लग्नानंतर मुलगी आणि मुलगी दोघांचेही कुटुंब एकमेकांशी जोडले जाते. बरेचदा लग्नानंतर पती पत्नी फक्त एकमेकांना समजण्यातच किंवा एकमेकांसोबतच राहण्यात वेळ व्यतीत करतात. मात्र ते विसरून जातात की आता आपण एका नव्या कुटुंबाचाही हिस्सा झालो आहोत. लग्न म्हणजे फक्त सेक्स नाही, सेक्सशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्या संसारिक जीवनात महत्वाच्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे नव्या कुटुंबातील लोकांशी नवीन प्रेमाचे नाते तयार करणे. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात जर का तुम्ही कुटुंबातील सदस्यांचे मन जिंकले तर त्या सदस्यांच्या मनासोबतच घरातही तुम्हाला महत्वाचे स्थान प्राप्त होईल.  यासाठी जाणून घ्या काही महत्वाच्या गोष्टी.

लग्नानंतर पती शिवाय अनेक नवी नाती मिळतात. सासू, सासरा, नणंद, दीर असे अनेक लोक आपल्या नात्याच्या हिस्सा बनतात. मात्र सध्याची पिढी अशा नात्यांना तितकेसे महत्व देत नाही. मात्र लक्षात ठेवा हे प्रत्येक नाते तुमच्या जीवनात काही ना काही महत्वाची भूमिका बजावत असते. या नात्याचे महत्व जाणा आणि ते वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या इच्छेखातर या नात्यामध्ये कडवटपणा आणू नका.

घरातल्या वडिलधाऱ्या लोकांनाही हे समजणे महत्वाचे आहे, की आता मुले मोठी झाली आहेत. त्यांचे निर्णय त्यांना स्वतः घेऊ देत. प्रत्येक वेळी प्रश्न विचारणे, आडकाठी घालणे हे बरोबर नाही. जर का तुमच्या घरातील वडीलधारी मंडळी हे समजत नसतील तर तुम्ही त्यांना हे समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्यावर चिडचिड करणे हा उपाय नाही.

लग्नानंतर घर बदलते, त्याचसोबत सवयीदेखील बदलतात. यामुळे नव्या नवरीला नव्या घरी रुळायला थोडा वेळ लागतो. खाण्या पिण्याच्या सवयी, (उदा शाकाहार-मांसाहार) चालीरीतीदेखील वेगळ्या असतात हे त्या मुलीला समजून घेण्यास वेळ दिला पाहिजे. मुलीनेही चिडचिड न करता आपल्या नव्या कुटुंबाला, नव्या बदलांना जमेल तसे स्वीकारायला पाहिजे.

भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. अशा लोकांचे धार्मिक विचारही वेगवेगळे असतात. धर्माच्या संकल्पना वेगवगेळ्या असतात. जर तुमच्या पार्टनरचे धार्मिक विचार तुमच्यापेक्षा वेगळे असतील तर घाबरून जाऊ नका. तुमचे विचार पार्टनरवर थोपवण्याऐवजी त्याच्या विचारांचा आदर करा.

छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात चिडचिड करू नका. घरातील प्रत्येक सदस्याच्या विचित्र तऱ्हा असतील, त्याबाबत चीड चीड करण्याऐवजी आपण त्या कशा स्वीकारू शकतो याचा विचार करा. घरातील वडीलधारी मंडळी काही सांगत असतील ते ऐका, कारण ते त्यांचे अनुभवाचे बोल असतात.