5Rs And 10Rs Old Coins:  तुमच्याजवळील 5 आणि 10 रुपयांची जुनी नाणी आता तुम्हाला बनवतील लखपती; नेमकी कशी करायची विक्री? घ्या जाणून
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आपण अनेकदा पाहतो की, काही जणांना जुन्या गोष्टी जमा करण्याचा छंद असतो. याशिवाय, काही लोकांना जुन्या नोटा किंवा नाणी साठवून ठेवण्याची आवड असते. यातच अशा लोकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याकडेही काही जुनी नाणी असतील तर, तुमच्याकडे लखपती होण्याची चांगली संधी आहे. इंडियामार्टच्या वेबसाईवर या नाण्यांची ऑनलाईन विक्री सुरु झाली आहे. एवढेच नव्हेतर, या नाण्यांना लोक 5 ते 10 लाखांपर्यंत खरेदी करत आहेत. मात्र, या नाण्यांची नेमकी विक्री कशी करायची? याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

भारतात नोटबंदी करण्यात आली त्यावेळी सगळ्या जुन्या नोटा रोजच्या व्यवहारातून बाद करण्यात आल्या आहेत. यावेळी 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. पण सध्या जुन्या नाण्यांची किंमत चांगलीच वाढली आहे. ज्या नाणींवर वैष्णव दैवीचा फोटो आहे, अशा नाण्यांचा मागणीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या नाण्यांना 2002 मध्ये छापण्यात आले होते. केवळ 5 आणि 10 च्या नाण्यांवरच हा फोटो छापण्यात आला आहे. हे देखील वाचा- Navratri 2020: नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते? जाणून त्याचं महत्त्व आणि खास मंत्र!

महत्वाचे म्हणजे, देवीची फोटो असलेले नाणी क्वचितच बाजारात पाहायला मिळतात. काहीजण देवीचा फोटो असलेले नाणी स्वत:कडे ठेवतात. देवीचा फोटो असलेली नाणी आपणही जवळ ठेवली तर आपली भरभराट होईल अशी लोकांची श्रद्धा आहे. यामुळे इंडियामार्टच्या वेबसाईटवर जुन्या नाणींची विक्री अथवा खरेदी केली जात आहे. लोक या वेबसाईटवर वारंवार सर्च करत आहेत.