Rashifal | Representational Image (Photo credits: Twitter/ChrisPage90)

ग्रहांच्या चालीरितींवर आणि त्यांच्या दिशांमधील बदलांवर सतत योग बदलत राहतात. यामुळे आपल्या जीवनावर होणारा त्याचा परिणाम देखील बदलत राहतो. यंदा 9 फेब्रुवारी पासून मकर राशीमध्ये षडग्रही योग बनत आहे. म्हणजे मकर राशीमध्ये सहा ग्रह सूर्य, चंद्र, बुध, गुरू, शुक्र आणि शनि एकसाथ दिसणार आहेत. हे ग्रह 11 फेब्रुवारीपर्यंत मकर राशीमध्ये राहणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान चालणारा हा षडग्रही योग दुर्मिळ आहे.

प्रामुख्याने मकर राशी मध्ये गुरू आणि शनी चा अधिक संचार असतो. पण यंदा 2 दिवस 6 ग्रहांचा वावर असेल. मकर राशी मधील हा षडग्रही योग 59 वर्षांपूर्वी देखील बनला होता. 1962 साली हा योग बनला होता. आता देखील असा योग बनणं हा राजकीय क्षेत्रात बदलावांचे संकेत देणारा आहे. राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस.

मागील महिन्यात 24 तारखेपासून शनि मकर राशीत आहे. मकर राशी शनीच्या अधिपत्याखाली येणारी आहे. 20 नोव्हेंबरला गुरू या राशीत पोहचला आहे. नंतर बुध, शुक्र आणि सूर्य यांचा समावेश झाला. यामुळे शनीच्या मकर राशीत पंचग्रही युती झालेली आहे. मंगळवारी रात्री चंद्राचा समावेश झाल्याने आता हा षडग्रही योग झाला आहे. पश्चिम आणि उत्तर भागात एकाएकी वातावरणात बदल बघायला मिळेल. शेतकरी आणि व्यापार्‍यांसाठी हा बदल संघर्षमय असेल. ज्योतिषाचार्य गोपाल दत्त त्रिपाठी यांनी जागरण ला दिलेल्या माहितीनुसार, धर्म, अध्यात्म आणि शिक्षा या क्षेत्रामध्ये यामुळे चांगले बदल बघायला मिळतील. महिलांच्या सन्मानामध्ये वाढ होईल. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

1962 साली अशाप्रकारेच मकर राशीत 7 ग्रहांची युती झाली होती. त्यावेळेस अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये मिसाईल संकट निर्माण झालं होतं. 1979 मध्ये अशाचप्रकारे झालेल्या ग्रहांच्या युती दरम्यान सिंह राशीत 5 ग्रह आल्याने ईरान मध्ये इस्लामिक क्रांती होऊन मुस्लिम जगतात बदल झाले होते.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या हेतूने लिहण्यात आला आहे. लेटेस्टली मराठी यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही.