सध्या प्रत्येकाच्या आयुष्यात स्मार्टफोन हा एक अभिवाज्य घटक बनला आहे. वाढत्या स्मार्टफोनच्या वापरामुळे एका अभ्यासातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. भारतात 19 टक्के महिला अॅपचा वापर डेटिंगसाठी पार्टनरचा शोध घेण्यासाठी करतात. यावेळी दीर्घकाळासाठी किंवा कमी काळासाठी महिला आपल्यासाठी पार्टनरचा शोध घेतात. भारतात हा दर 19 टक्के असून जगभरात हा दर 21 टक्के आहे.(Women Watch Porn: लॉकडाऊन काळात ताणतणाव प्रसंगी महिलांचा पॉर्न पाहण्याकडे तर पुरुषांचा चॉकलेट्स खाण्याकडे कल, मद्यपान काहीसे समप्रमाण- संशोधक)
या अभ्यासातून एक धक्कादायक तथ्य असे ही समोर आले आहे की, भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्या 62 टक्के महिला अशा आहेत ज्या सेक्सटिंगसाठी वापर करतात. म्हणजेच सेक्सी फोटो आणि मेसेज समोरच्या व्यक्तिला पाठवणे. हा खुलासा आंतरराष्ट्रीय अभ्यास, रुचिका उनियालच्या रिपोर्टमध्ये झाला आहे. हा रिसर्च या आठवड्यात जर्नल प्लोस वन येथे पब्लिश करण्यात आला आहे. रिसर्चमध्ये 191 देशांतील महिलांचा समावेश आहे. एकूण 1,30,885 महिलांवर हा रिसर्च करण्यात आला आहे. यामधील 23,093 महिला भारतामधील होत्या. ऑनलाईन पद्धतीने विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली आहेत.
महिलांनी दिलेल्या उत्तरात असे ही दिसून आले की, अधिक लैंगिक असमानता आहे. त्यामुळेच मोबाईल अॅपच्या माध्यमातून सेक्स पार्टनरचा शोध घेतला जातो. पण असे पहायला गेल्यास महिला चारपट अधिक सेक्सटिंग करतात. रिसर्च मधील आकडेवारी पाहता 4362 जवळजवळ 19 टक्के महिलांनी स्विकार केले की त्या मोबाईलचा वापर पार्टनर शोधण्यासाठी करतात. या महिलांचे वय 18 ते 54 वर्ष असे आहे. पण यामध्ये 21 ते 24 वयोगटातील महिला अधिक अॅक्टिव्ह असून त्या डेटिंग अॅपचा सर्वाधिक वापर करतात. ज्या महिला पार्टनरचा शोध घेतात त्यामध्ये 29 टक्के महिला अशा होत्या की त्या फक्त मजा करण्यासाठी पार्टनर शोधतात.(Swan Makes Woman Wear Her Mask: महिलेला मास्क घालण्याची योग्य पद्धत शिकवणारा हंस सोशल मीडियावर व्हायरल Watch Video)
44 टक्के महिलांनी असे सांगितले की, त्या Short Period साठी पार्टनरचा शोध घेतात. तर 37 टक्के महिला दीर्घकाळासाठी पार्टनर शोधतात. 24 टक्के महिला अन्य काही कारणांसाठी पार्टनरचा शोध घेतात. एकूण 22,093 महिलांमधील 62 टक्के महिला या सेक्सटिंग करत असल्याचे समोर आले आहे. भारतातील 13 टक्के महिलांनी असे म्हटले की, त्या अॅपचा वापर सेक्स संबंधित वाचण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी करतात. तर 28 टक्के महिलांना सेक्शुअल अॅक्टिव्हिटी संबंधित माहिती मिळवण्यासाठी अॅपचा वापर करतात.