कोरोना व्हायरस संकट काळात (Coronavirus Pandemic) सामान्यांच्या आयुष्यात मास्कचे (Mask) महत्त्व वाढले आहे. कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक आहे. परंतु, काही लोक मास्क घालण्याचा नियम तितक्या गंभीरतेने घेत नसल्याचे तुमच्याही निदर्शनास आले असेल. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. यात एक हंस (Swan) महिलेच्या तोंडावर मास्क घालताना दिसत आहे. हंसाची ही कृती सोशल मीडियावर हिट ठरत आहे. हा फनी व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
एक महिला चेहऱ्यावर मास्क घालून हंसाजवळ जाते आणि मास्क खाली करते. त्यामुळे तो मास्क नाका-तोंडावर न राहता गळ्याभोवती येतो. जशी ती महिला हंसाच्या अधिक जवळ जाते. तो हंस आपल्या चोचीने गळ्याजवळ असलेला मास्क उचलून तोंडावर आणून सोडतो. मात्र हंसाच्या या कृतीने महिला काहीशी बावरते आणि मागे पडते. (रेस्क्यू झाल्यानंतर चिमुकली बकरी आईला अशी काही भेटली; पहा व्हायरल होणारा हृद्यस्पर्शी व्हिडिओ, Watch Video)
पहा व्हिडिओ:
— -VÉNOM- (@anthonysarti11) September 10, 2020
हंसाने दिलेली ही महत्त्वपूर्ण शिकवण सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सध्या कोविड-19 च्या संकटात हंसाने आपल्या कृतीने माणसालाही जागृत केले आहे. हा व्हिडिओ केवळ 2 सेकंदाचा असून आतापर्यंत तब्बल 71.7 लाख लोकांनी पाहिला आहे. यापूर्वीही अनेक व्हिडिओतून प्राण्यांची हुशारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यात आता अजून एका व्हिडिओची भर पडली असे म्हणायला हरकत नाही.
दरम्यान या व्हिडिओवर युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रीय येत आहेत. कोणी म्हणतंय, मास्क लावण्याचे धडे देणारे हंस आपण देशभरात तैनात करु. कोणी म्हणतंय, प्राणी माणसांपेक्षा अधिक स्मार्ट आहेत. तर एका युजरला हा हंस आपल्या दुकानात ठेवायचा आहे जो मास्क न लावणाऱ्या ग्राहकांना मास्क घालण्यास शिकवेल. तर काहींनी या व्हिडिओचा मनमुराद आनंद घेतला आहे. व्हिडिओतील हास्याचा भाग सोडला तर कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता मास्क घालणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मास्क घालण्याचा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळा.