Baby Goat Meets Mother: रेस्क्यू झाल्यानंतर चिमुकली बकरी आईला अशी काही भेटली; पहा व्हायरल होणारा हृद्यस्पर्शी व्हिडिओ (Watch Video)

काही तासांनी आईला पाहून जोरात धावत जाऊन बिलगलेलं बकरीचं पिल्लू पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. सध्या ट्वीटरवर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Baby Goat Meets Mother: रेस्क्यू झाल्यानंतर चिमुकली बकरी आईला अशी काही भेटली; पहा  व्हायरल होणारा हृद्यस्पर्शी व्हिडिओ (Watch Video)
चिमुकली बकरी । Photo Credits: Twitter

Baby Goat Meets Mother:  आईचं तिच्या मुलांसोबतच नातंच काही और असते. मग ते माणसांमध्ये जसं आहे तसंच ते प्राण्यांमध्येदेखील आहे. सध्या अशाच एका चिमुकल्या बकरीचा आणि तिच्या आईच्या भेटीचा एक क्षण सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तासांनी आईला पाहून जोरात धावत जाऊन बिलगलेलं बकरीचं पिल्लू पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. सध्या ट्वीटरवर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान एका खड्ड्यामध्ये बकरीचं पिल्लू पडलं होतं. स्थानिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी त्या पिल्लाची सुखरूप सुटका केली. पिल्लाला बाहेर काढल्यानंतर रात्री त्याला घरातच ठेवलं. दरम्यान या पिल्लाचा थांगपत्ता लावण्याचा, मालक शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. दुसर्‍या दिवशी पांढर्‍याच फर असलेल्या एक बकर्‍‍यांचा कळप येताना दिसला. ते चिमुकलं बकरीचं पिल्लू लांबूनच आईला पाहून आनंदित झालं आणि धावत धावत जाऊन आईला बिलगलं. (हेही वाचा नक्की: Viral Video: कुत्र्याने बकरीच्या पिल्लाला बाटलीने पाजले दूध; पहा व्हिडिओ).

ट्वीटरवर रेक्स चैपमैन (Rex Chapman) या युजर ने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोबतच घडलेला प्रसंग लिहला आहे. 'माणूसकी' म्हणत हा सारा प्रसंग कथित करण्यत आला आहे.

इथे पहा व्हिडिओ

रेक्स चैपमैनने शेअर केलेला हा व्हिडीओ अवघ्या 23 सेकंदाचा आहे. सुरूवातीला रेंगाळत चालणारं पिल्लू आईला पुन्हा भेटून आनंद झाल्यानंतर ज्या उर्जेने बकरीकडे झेपावलं ते पाहून अनेकांना हा व्हिडिओ हृद्यस्पर्शी वाटत आहे. 12 तासांपेक्षा कमी वेळेमध्ये  या व्हिडिओला 18 लाखाहून अधिक व्ह्युज आहेत. 1.3 लाख लाईक्स तर 28 हजारांपेक्षा अधिक कमेंट्स आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2020 01:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).