मनीप्लांट (Photo credit : Samachar Nama)

घरात पैसा येत राहावा, आर्थिक तंगीपासून मुक्ती मिळावी, घरात सुख-शांती नांदावी म्हणून घरात मनीप्लांट लावण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्र बारकाईने पहिले तर मनीप्लांटचे अनेक फायदे दिसून येतील. मनीप्लांट हा सदैव हिरवा राहणारा वेल आहे. भिंतीवर अथवा कुंडीत वाढणारा मनीप्लांट 400 मी. पर्यंत वाढू शकतो. मात्र घरात मनीप्लांट लावताना त्याची व्यवस्थित काळजी घेणे फार महत्वाचे असते. आर्थिक फायद्यासाठी मनीप्लांट घरात ठेवण्याची एक विशिष्ट जागा असते. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही हा मनीप्लांट लावला नसेल, तर यामुळे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. चुकीची दिशा आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरु शकते. चला तर पाहूया घरी मनीप्लांट लावताना कोणती काळजी घ्यायला हवी.

> वास्तुशास्त्रानुसार मनीप्लांट आग्नेय दिशेला लावला गेला पाहिजे. आग्नेय दिशेला झाड लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा खेळती राहते. आग्नेय म्हणजे दक्षिण-पूर्वच्या मधली दिशा. या दिशेचा देवता गणपती आहेत. गणपती अशुभ गोष्टीचा नाश करतो, त्यामुळे मनीप्लांट आग्नेय दिशेला लावला पाहिजे. तसेच या दिशेचे प्रतिनिधीत्व शुक्र करतो. शुक्र हा घरात सुख समृद्धी आणतो.

> मनीप्लांटला कधीही घराबाहेर लावू नये, घरातच लावावे.

> मनीप्लांटला कधी सुकू देऊ नका, पाने सुकून गळून पडत आहेत असे वाटले तर ती पाने काढून टाका.

> मनीप्लांट जास्त वेळ उन्हात ठेवू नये. सुकलेला मनीप्लांट पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण करतो.

> मनीप्लांटला नेहमी वरच्या दिशेने चढवा, वेल मोठा झाला असेल तर काठीने त्याला बेस द्या. मनीप्लांट कधीही जमिनीवर खाली वाढू देऊ नये.

> घरात जाग नसल्याने तुम्ही जर बाटलीमध्ये मनीप्लांट लावला असेल तर वाटलीमधील पाणी वेळोवेळी बदलने गरजेचे आहे.

> वास्तुशास्त्रानुसार मनीप्लांट ईशान्य दिशेला लावू नये. ईशान्य म्हणजे उत्तर-पूर्व मधली दिशा.

> आपल्या घरातील मनीप्लांटचा तुकडा अथवा पान शक्यतो इतरांना देणे टाळावे.