Image For Representations (Photo Credits: File Image)

सेक्स लाईफ (Sex Life) उत्तम असेल तर आपला साधारण दिवस सुद्धा आनंदी बनण्यात  मदत होते असं म्हणतात, अर्थात ज्यांनी हा अनुभव घेतला असेल त्यांना हे नव्याने सांगण्याची गरज नाही, आणि जर का तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर याहून चांगले मोटिव्हेशन अजून काय असणार हो ना? वास्तविक सेक्स हा एक अनुभव ज्याची मजा ही प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळी असते, काहींना फोरप्ले मध्ये जास्त रस वाटतो तर काहींना हार्डकोअर सेक्स मध्ये, पण या एकूणच प्रक्रियेमध्ये काही कॉमन पॉईंट्स येतात आणि जर का वेळोवेळी या पॉइंट्समध्ये नावीन्य आणलं नाही तर एका वेळेनंतर याच गोष्टी बोअरिंग सुद्धा भासू शकतात. असं होऊ द्यायचं नसेल तर तुमच्या सेक्स रुटीन (Sex Routine) मध्ये हे काही छोटे बदल करणे आवश्यक आहेत, ते कोणते हे आज आपण पाहणार आहोत.. चला तर मग..

Sex Tips: सेक्स पूर्वी Masturbate केल्याने बेडवर जास्त वेळ टिकून राहण्यात होते मदत? जाणून घ्या उत्तर

शरीराला फील करा

तुमच्या पार्टनरच्या शरीराला फील करणे हे उत्तम सेक्स साठी आवश्यक आहे. फोरप्ले पासून या गोष्टीची तुम्ही सुरुवात करू शकाल, यासाठी पार्टनरच्या शरीरावर चॉकलेट सॉस, बटर किंवा जेली लावून तुम्ही ही सुरुवात थोडी स्पाईस अप करू शकाल. खास टीप म्हणजेच जर का तुमहाला पार्टनरला स्वतःकडे आकर्षित करायचे असेल तर शरीराची काळजी घ्या, निदान स्वच्छतेची सवय लावून घ्या.

फोरप्ले आणि टिझिंग

तुम्ही ऐकलं असेल की, एखादी गोष्ट सहज मिळाली की त्याची किंमत राहत नाही, बाकी गोष्टींचा अंदाज लावता येत नसला तरी सेक्स मध्ये तुम्ही हे पडताळवून घेऊ शकता, करायचं असं की आपल्या पार्टनरला आपल्या त्या स्पेशल गोष्टीसाठी थोडी वाट पाहायला लावा, या वेळेत जबरदस्त फोरप्ले च्या मार्फत त्यांना शक्यता तितके उत्तेजित करा आणि एकदा की तुम्हाला तुमचा पार्टनर आता काही कंट्रोल करू शकणार नाही असे वाटेल तेव्हा पेनिट्रेशन सुरु करा.

कधीतरी महिलेला घेऊ द्या लीड

बहुधा सेक्सचा शोध लागल्यापासूनच पुरुष वर आणि महिला खाली अशी सेक्स पोझिशन हिट ठरली आहे, पण वारंवार हेच केल्याने कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे, कधीतरी तुमच्या फिमेल पार्टनरला लीड घेऊ द्या, यासाठी वुमन ऑन टॉप म्हणजेच काउगर्ल सारख्या पोझिशन ट्राय करू शकता. या पोझिशन्समध्ये सर्व कंट्रोल महिलेच्या हाती असल्याने त्या जास्त एन्जॉय करू शकतात, आणि जर का तुम्हाला बेडवर डॉमिनेटिंग पार्टनर पाहायचा असेल तर याहून उत्त पर्याय नाही.

वेगवेगळ्या जागी करा सेक्स

Come On! एकाच ठिकाणी सेक्स करून कोणालाही कंटाळा येईल, पण यामद्ये व्हरायटी अशी काय आणायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर घरातच कधी किचन मध्ये कधी बाथरूम मध्ये, अगदीच दोघे राहत असाल तर बालकनी मध्ये सेक्सचा अनुभव घेता येईल. तसेच यावेळी स्टँडिंग पोझिशन ट्राय करता आल्यास अति उत्तम!Hot Sex Positions: बेडवर सुखद अनुभव टिकवण्यासाठी हळू हळू करायच्या 'या' सेक्स पोझिशन करतील मदत

Get Dirty

अनेकांना सेक्स करताना डर्टी टॉक केलेले आवडते, काहींना तुम्ही जितके ओलसर वाटाल त्यावरून उत्तेजना मिळते, त्यामुळे ओल्या अंगाने सेक्स करणे हा एक पर्याय निवडता येईल, तसेच ऑइल मसाज केलेल्या शरीराने सुद्धा तुम्हा सेक्स करू शकता, याचा फायदा असा कि यामुळे शरीर चमकताना दिसून येते जे की पार्टनरला आकर्षित करते आणि वेगळ्या ल्युब्रिकेशनची गरज लागत नाही.

(टीप: हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे  यास सल्ला समजू नये, तुमच्या पार्टनर्शी बोलून संबंधित निर्णय घ्यावेत)