Masturbation representational image (Photo credits: Pixabay)

सेक्स (Sex) करताना पार्टनर किती वेळ टिकून राहू शकतो या प्रश्नाचे उत्तर हे थेट तुम्ही सेक्स मध्ये किती एन्जॉय करू शकणार आहेत याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे साहजिकच  सेक्स स्टॅमिना (Sex Stamina)  वाढवण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत असतो. अशातच आपल्यापेक्षा पार्टनरचा स्टॅमिना जर का कमी असेल तर हा छोटासा मुद्दा सुद्धा भांडणाचे कारण बनू शकतो. विश्वास बसणार नाही, पण जगात विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढण्यामागे वैवाहिक जीवनात सेक्स मध्ये मजा येत नाही हे प्रमुख कारण म्ह्णून समोर आले आहे. अर्थातच हा अडथळा आपल्या नात्यात येऊ नये म्ह्णून अनेक जण सेक्सच्या ट्रिक्स आणि टिप्स बाबत जाणून घ्यायाला उत्सुक असतात, असाच एक कॉमन प्रश्न आज आपण सुद्धा पाहणार आहोत. सेक्स करण्यापूर्वी हस्तमैथुन (Masturbate)  केल्याने तुमच्या स्टॅमिना वर परिणाम होतो का? बेडवर टिकून राहण्यास मदत होते का? असा एक सर्वसामान्य प्रश्न आज आपण पाहुयात..

Hot Sex Positions: बेडवर सुखद अनुभव टिकवण्यासाठी हळू हळू करायच्या 'या' सेक्स पोझिशन करतील मदत

आपण सेक्स आणि वयोमान अशी तुलना करायला गेल्यास साधारण नव्याने सेक्स करणारे पुरुष असतील म्हणजेच 20 ते 25 वयोगट असेल तर स्टॅमिना हा नैसर्गिक कमी असतो. साधारण तिशीत येताना हा स्टॅमिना वाढतो,आणि पुन्हा चाळीशीच्या घरात जाताना कमी कमी होत जातो. त्याचप्रमाणे सेक्सच्या एका सेशनचा विचार करायला गेल्यास, पहिल्यांदा तुम्ही जेव्हा सेक्स करता तेव्हा प्रत्यक्ष पेनिट्रेशनच्या वेळी पहिल्यांदा तुमचा स्टॅमिना कमी असतो पण तुलनेत दुसऱ्या वेळी यामध्ये वाढ होते. त्यामुळे साहजिकच जर का तुम्हाला सेक्स वर टिकून राहायचे असेल आणि तुमच्या पार्टनरला मल्टिपल ऑर्ग्जम्स देऊन खुश करायचे असेल तर सेक्स आधी एकदा हस्तमैथुन करून फायदा होऊ शकतो.

दरम्यान, बेडवर तुमचा स्टॅमिना अगदीच कमी असेल तर ही तुमच्या अनियमित जीवनशैलीला खाउनवणारी गोष्ट असू शकते, नेहमीच्या रुटीन मधुनन थोडा वेळ काढल्याने, व्यायाम आणि आहार नेटाने पाळल्याने तुम्हाला नैसर्गिक रित्या स्टॅमिना वाढीत मदत होऊ शकते, याशिवाय आलं, केशर, ऑयस्टर सारखे पदार्थ सुद्धा तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात मात्र त्यांचा वापर करताना नेहमी संतुलित सेवन आवश्यक आहे.

(टीप: हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यांस वैदकीय सल्ला समजु नये.)