आनंदी सेक्स लाईफ (Hppy Sex Life) कायम राहवे असे आपल्यापैकी अनेकांची इच्छा असते. मात्र चांगल्या चाललेल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की, सुरळीत सुरु असलेल्या सेक्स लाईफ (Sex Life) मध्ये बिब्बा घातला जातो. म्हणजेच हे लाईफ संपुष्टात येते कंटाळवाणे (Boring Sex Life) होऊ लागते. हे लाईफ संपुष्टात येण्यासाठी कारणीभूत ठरतात आपल्या काही सवयी. आता या सवयी नेमक्या कोणत्या? तशा तर अनेक सवयी इथे सांगण्या सारख्या आहेत. परंतू, त्यातीलच काही प्रातिनिधीक स्वरुपात इथे देत आहोत. ज्या तुमचे सेक्स लाईफ (Sex Life) अडचणीत आणतात.
मानसिक सक्षमता
सेक्स लाईफ जर आनंदात घालवायचे असेल तर दोन्ही जोडीदार शारीरिक आणि मानसिक दृष्टा सक्षम असायला हवेत. त्यासाठी दोघांनीही आपल्या आरोग्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जे आपल्या आरोग्याबाबत अधिक दक्ष असतात असे लोक आपले सेक्स लाईफ अधिक चांगल्या प्रकारे एन्जॉय करतात. (हेही वाचा, Sex during Coronavirus: सेक्स करायचाय पण कोरोना आढवा येतो...? हे पर्याय वापरता येतील का?)
लठ्ठपणा
शरीराचा लठ्ठपणा सेक्स लाईफमध्ये मोठा अडथळा ठरतो. ज्यांना शारीरिक समस्या आहेत त्यांचे ठिक आहे. परंतू, शारीरिक समस्या नाहीत परंतू जे लठ्ठ आहेत अशांचे सेक्स लाईफ कंटाळवाणे ठरु शकते. एक रिपोर्ट असेही सांगतो की लठ्ठ लोकांमध्ये फॅट सेल्स एस्ट्रोजेन (फीमेल हॉर्मोन) निर्मिती करतो ज्यामुळे सेक्स ड्राइव्ह मध्ये कमतरता येते. नियमीत व्यायाम करणाऱ्या मंडळींचा सेक्स ड्राइव्ह अधिक बळकट असतो.
ताणतणाव
कितीही जबाबदरी, चिंता, संकट असले तरीही ताणतणाव दूर ठेवता आला पाहिजे. जो व्यक्ती ताण तणावापासून दुर राहतो त्याची सेक्स लाईफ अधिक चांगली असते. ताणतणावापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीची सेक्स ड्राईव्ह अधिक चांगली राहते असे अभ्यासक सांगतात. त्यामुळे ताणतणावापसून नेहमीच दूर राहा.
पुरेशी झोप
सेक्स लाईफ अधिक आनंदी बनविण्यासाठी पुरेशी झोप घेणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप मिळाली नाही तर, शरीरात थकवा कायम राहतो. थकलेल्या शरीराने सेक्स लाईफ आनंदी राहू शकत नाही. पुरेशी झोप न घेता सतत कार्यरत राहणाऱ्या व्यक्तिंची सेक्स लाईफ हळूहळू कमी होत पुढे पूर्णपणे थांबू शकते. म्हणूनच पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. प्रौढ व्यक्तीस किमान 7 ते 8 तासांची झोप पुरेशी मानली जाते. (हेही वाचा, Monsoon Sex Tips: पावसाळ्यात जोडप्यांमधील Romance वाढविण्यासाठी 'सुपरहॉट' सेक्स आयडियाज)
अंमली पदार्थांचे सेवन
अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे नियमीत आणि मोठ्या प्रमाणावर सेवन हे सुद्धा आनंदी चाललेल्या सेक्स लाईफमध्ये अडथळा ठरु शकते. लैंगिक विषयातील तज्ज्ञ सांगतात नियमीतपणे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांचे पतन अधिक लवकर होते. कमी कालावधीत स्खलन झाल्याने सेक्स लाईफचा पुरेसा आनंद घेता येत नाही.
नैराश्य
अनेकदा नैराश्य हे सुद्धा उद्ध्वस्त झालेल्या सेक्स लाईफचा पाया असू शकते. त्यामुळे हा पाया मुळाासून उखडून फेकण्यासाठी नैराश्येला दूर ठेवा. नैराश्येत असलेल्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. आत्मविश्वास नसेल तर तो व्यक्ती कोणतेच काम चांगल्या प्रकारे करु शकत नाही. त्यामुळे नैराश्य झटकून आत्मविश्वास पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करा.
दरम्यान, चुकीचा आहार हासुद्धा लैगिंक जीवननावर परिणामकारक ठकतो. लैंगिक जीवन चांगले ठेवायचे असेल तर शरीरास आपायकारक, चुकीचा आणि चुकीच्या वेळी आहार घेणे टाळा. प्रामुख्याने जंक फूड, प्रोसेस्ड फूड आहारातून पहिले कमी करा. चुकीचा आहार तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम करतो. त्यामुळे काळजी घ्या.