कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाने मानवी जगण्याचे परीमानच बदलून टाकले आहे. आपल्या सामाजीक वावरण्यापासूनत ते व्यक्तिगत आयुष्यातील संबंधांपर्यंतच्या आयुष्याची घडी कोरोनाने विस्कटून टाकली आहे. सोशल डिस्टन्सिंग (Social Distance) पाळताना आम्ही एकमेकांना आलिंगन (Hugs) देणे आणि हस्तांदोलन (Handshakes) करणे केव्हाच विसरून गेलो आहोत. आता शरीरसंबंध (Sex) ठेवणेही विसरुन जायचे की काय इथपर्यंत प्रकरण आले आहे. त्यामुळे सेक्स करायचा आहे पण करोना आढवा येतोय.. अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. पण, लैंगिक भावनांचे शमन करण्यासाठी प्रत्येक वेळी सेक्स (Intercourse) आवश्यकच आहे असे नाही. आपण इतरही अनेक मार्ग वापरु शकता.
तुम्ही सेक्स करु शकता पण...
कोरोना व्हायरस काळात सेक्स करावा की नाही? याबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (World Health Organization)आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (Centre for Disease Control and Prevention) यांनी कोणतेच स्पष्ट निर्देश दिले नाहीत. परंतू, कोरोना व्हायरस संसर्ग नसलेल्या आणि बराच काळ एकत्र राहात असलेल्या व्यक्ती सेक्स करु शकतात, असा एक मतप्रवाह आहे. तर परस्परांपासून (शारीरीक पातळीवर) दूर असलेल्या म्हणजे वेगवेगळ्या शहरात, ठिकाणी अथवा वेगवेगळ्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी शक्यता सेक्स टाळावा असाही दुसरा मतप्रवाह आहे. दरम्यान, काही देशांनी सेक्स करण्यावर बंधणे अथवा मर्यादा घातल्याचेही वृत्त आहे. (हेही वाचा, Sex During Lockdown: लॉकडाउन मुळे सेक्स लाईफ झालंय बोअरिंग रुटीन? पुन्हा स्पार्क आणण्यासाठी 'या' खास टिप्स करतील मदत)
हस्तमैथून
असे म्हणतात की कोणत्याही प्रकारचा शरीरसंबंध पूर्ण होण्यासाठी दोन व्यक्तिंना एकत्र यावे लागते. त्यांच्यात शरीसंबंध (संभोग) व्हावा लागतो. परंतू, कोरोना काळात असे होणे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा काळात हस्तमैथून हा एक चांगला पर्याय आहे. हस्तमैथून ही प्रक्रिया पूर्णपणे आत्मनिर्भर असते. त्यामुळे यातून कोरोना व्हायरस संक्रमनाचा धोका जवळपास नसतोच. फक्त कोरोना टाळण्यासाठी हस्तमैथूनचा पर्याय वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. तसेच, स्वच्छताही बाळगायला हवी. नाहीतर इतर गोष्टींचा संसर्ग होऊन आरोग्याच्या भलत्याच तक्रारी निर्माण होऊ शकतात.
सेक्स टॉय
हस्तमैथून करण्यासोबतच सेक्सटॉय वापरणे हा पर्यायही प्रभावी आहे. अर्थात हा पर्याय पूर्णपणे ऐच्छिक आणि स्वत:च्या जबाबदारीवर करण्याचा आहे. त्यामुळे सेक्स टॉय वापरून लैंगिक भावनांचे दमन करणाऱ्या व्यक्तिलाही योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. जसे की, सेक्स टॉयचा प्रकार, त्याचे आकारमान, स्वच्छता वैगेरे वैगेरे. पण, परस्परांचा संपर्क टाळण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.
दरम्यान, आपण डीजिटल माध्यमांचा वापर करतही सेक्स फील घेऊ शकता. पण, हा प्रकार वापरणे काहीसे धोकादायक आहे. डीजिटल माध्यमांचा वापर करणे म्हणजे व्हिडिओ, फोनवरुन बोलणे, मेसेज अशा प्रकारे आपल्या जोडीदाराशी भावना उत्तेजीत होतील असा संवाद करणे. पण, हा अत्यंत धोकादायक मार्ग आहे. जर यात योग्य ती काळजी घेतली नाही तर, काही हॅकर आपला फोन हॅक करुन अथवा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन आपला डेटा चोरु शकतात. हा डेटा सोशल मीडियावर व्हायरस व्हायरल होऊ शकतो. अथवा इतर काही चुकीच्या मार्गाने वापरला जाऊ शकतो. ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिमा मलीन होऊ शकते.