जर का जोडप्यांची सेक्स लाइफ (Sex Life) उत्तम चालू असेल, तर त्यांच्या चेहऱ्यावर त्या गोष्टीचा आनंद स्पष्ट दिसतो. पण लग्नानंतर काही दिवसांनी धावपळीच्या आयुष्यात करिअरमध्ये पुढे जाण्याची चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांमुळे लैंगिक संबंधांचे प्रमाण हळू हळू कमी होत जाते. अशा परिस्थितीत अवघे दोनवेळा हवे असूनही जोडपी सेक्सचा आनंद घेऊ शकत नाहीत. संभोगाच्या वेळी, जर पती-पत्नी दोघेही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एकमेकांना समजून घेत असतील, तर तो सेक्स चांगला होतो. मात्र अनेकवेळा यामध्ये दोघांपैकी एक तरी असंतुष्ट राहण्याची शक्यता असते. अशावेळी समोरच्या व्यक्तीला नक्की काय हवे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
समोरच्या व्यक्तीला नक्की किती सेक्स हवा आहे किंवा तो सेक्स बाबत किती विचार करतो हे जाणून घेणेही महत्वाचे आहे. याचसाठी आज आम्ही मदत करत आहोत.
सेक्स साठी योग्य वेळ -
लग्नानंतर जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवणे यापेक्षा, आपण त्याच्यासोबत भावनिकदृष्ट्या जोडले जाणे महत्वाचे आहे. आपले शरीर वयानुसार बदलते, वेगवेगळ्या वयोगटातील लोकांची कार्यक्षमता वेगळी असते. त्यामुळे सेक्सची इच्छाही वेगवगेळ्या वेळी उत्पन्न होते. मात्र बहुतेक लोकांची कामेच्छा रात्री 3 च्या सुमारास प्रचंड वाढते त्यामुळे हाच सेक्ससाठी योग्य काळ मानला गेला आहे.
कधी सेक्स करावा -
> सकाळी सेक्स केल्याने आपल्या शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि उर्जा पातळीत लक्षणीय वाढ होते. यावेळच्या सेक्सने दोघांचीही ऑक्सिटोसिनची पातळीही वाढते. मात्र आपल्या शेड्युलनुसार ज्यावेळी आपण निवांत असाल त्यावेळी सेक्स करणे योग्य ठरेल. अशावेळी दोघाही जोडीदारांना सेक्सची इच्छा असणे आवश्यक आहे.
> नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, मासिक पाळीच्या दोन आठवड्यांनंतर आपण लैंगिक संबंध ठेवले पाहिजे. यावेळी, महिलांच्या योनीचा वरचा स्तर सुमारे 20 टक्क्यांनी वाढतो. ओव्हुलेशनच्या वेळी महिलांमध्ये लैंगिक इच्छा अधिक असते, त्यामुळे यावेळी सेक्स करणे फायद्याचे ठरेल.
> व्यायाम केल्यावरही आपण सेक्स करू शकता. एका परदेशी विद्यापीठात केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, व्यायाम केल्यावर महिलांच्या जननेंद्रियांमध्ये रक्त प्रवाह 169 टक्के वाढतो अशावेळी त्यांचे सेक्स करण्याची इच्छाही वाढते.
> टेन्शन किंवा मानसिक तणाव असताना सेक्स केल्यास आपणास काही प्रमाण हलके वाटू शकते.
किती वेळा सेक्स करावा?
प्रत्येक विवाहित जोडप्याच्या मनात असा प्रश्न पडतो की, त्यांनी किती वेळा संभोग केला पाहिजे. या विषयावर प्रत्येकाची आपापली भिन्न मते आहेत. या विषयावरील संशोधनात असे सूचित केले गेले आहे की, बरेच जोडपे आठवड्यातून 2 ते 3 वेळा सेक्स करतात. तर सेक्स तज्ञ यावर सांगतात, आठवड्यातून 1-2 वेळा सेक्स करणे योग्य आहे. (हेही वाचा: Sex Tips: मासिक पाळी दरम्यान 'ओरल सेक्स' करणे सुरक्षित आहे का? काय घ्याल काळजी)
तसेच तज्ञांचे असेही म्हणणे आहे की, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक इच्छा आणि क्षमता वेगवेगळ्या असतात. नक्कीच आपल्याला लैंगिक संबंध ठेवण्याचे बरेच फायदे मिळतात, परंतु लैंगिक संबंध अनेक घटकांवर अवलंबून असतात. मात्र याबाबतच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, जी स्त्री एका महिन्यात सुमारे 11 वेळा लैंगिक संबंध ठेवते, ती आपल्या लैंगिक जीवनात समाधानी असते.
सरासरी पुरुष दिवसातून 34 वेळा सेक्सबाबत विचार करतात, तर महिला 18 वेळा विचार करतात. याचा अर्थ स्त्रियांना कमी सेक्स हवा असतो असे नाही. स्त्रियांसाठी सेक्सच्या नंबर पेक्षा तो सेक्स कसा होतो हे महत्वाचे आहे.
(या लेखात दिलेली माहिती ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर आहे. याबाबत आपला जोडीदार व डॉक्टरांशी बोलून योग्य तो सल्ला घ्यावा)