![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/Image-14-1-380x214.jpg)
Oral Sex During Periods: कित्येक महिलांना मासिक पाळीदरम्यान आपल्या जोडीदारासोबत सेक्स करणे पसंत नसते. त्याउलट अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान सेक्स करणे आवडते. किंबहुना ते आपल्या जोडीदाराला ओरल सेक्स करण्याचीही इच्छा प्रकट करतात. मात्र मासिक दरम्यान महिलेच्या शरीरातून जाणारे रक्त हे अशुद्ध असून त्यात अनेक प्रकारचे जंतू असतात असे सांगितले जाते. त्यामुळे असे घटक आपल्या शरीरात गेले तर त्याचाही आपल्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो वा कदाचित आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.
अशा वेळी Periods दरम्यान Oral Sex करणे योग्य आहे की नाही असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. अनेक पुरुषांना आपल्या स्त्री जोडीदाराच्या मासिक पाळी दरम्यान ओरल सेक्स करणे आवडत नाही. कारण हे खूपच धोकादायक होऊ शकते अशी त्यांच्या मनात भीती असते. कारण त्या दरम्यान Periods चे अशुद्ध रक्त महिलेच्या योनीतून जात असते. त्यामुळे ते तोंडावाटे आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीरास घातक ठरू शकते. या विचाराने अनेक पुरुष ओरल सेक्स साठी टाळाटाळ करतात. तसेच त्यांचा सेक्सचा मूडही निघून जातो.
याउलट काही पुरुषांना महिलांच्या मासिक पाळी दरम्यान सेक्स करण्याची तीव्र इच्छा होते. कारण काहींना स्त्रियांच्या शरीरातून होणारा तो रक्तस्त्राव आणि फेरोमोन चा वास पसंत करतात.
घ्यावयाची विशेष काळजी:
1. Periods दरम्यान Oral Sex करताना महत्त्वाचा सल्ला म्हणजे ओरल सेक्स आधी ती महिला पूर्णपणे सशक्त आणि निरोगी आहे की नाही याची खात्री करुन घ्या.
2. तसेच तिला HPV, HIV आणि सिफलिस सारखे गंभीर आजार आहेत की नाही याची खात्री करुन घ्या. कारण तसे असल्यास ते तुमच्या शरीरास घातकही ठरु शकतो.
हेदेखील वाचा-पुरुषांमध्येही आढळतात मासिक पाळीची लक्षणं, अनेकांचे मूड पीरियड्स टाइमवर स्विंग
3. जर महिलेला एखादा संसर्गजन्य किंवा अन्य गंभीर आजार असेल तर ओरल सेक्स करताना तो आजार तुम्हाला होण्याचीही दाट शक्यता असते.
4. जर तुमच्या महिला पार्टनरला असा काही आजार नसेल तर त्यांच्यासोबत Periods दरम्यान ओरल सेक्स करण्यास हरकत नाही.
5. तरीही तुमच्या मनात ओरल सेक्स ला घेऊन काही शंका असेल तर त्विरत Sexologist चा सल्ला घेऊ शकता.
आपल्या जोडीदारासोबत आपले नाते अजून घट्ट करणारा प्रक्रिया सेक्स ही जितकी तुम्ही अनुभवाल आणि त्याचा आनंद घ्याल तर तुमच्यात कधीही दुरावा निर्माण होणार नाही. मात्र त्यात दोघांची सहमती असणे आणि मानसिक तसेच शारीरिक तयारी असणे गरजेचे आहे.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)