मासिक पाळी (Menstrual) हा शब्द जरी उच्चारला तरी क्षणार्धात डोळ्यासमोर उभा राहते ती स्त्री देहाची प्रतिमा. अखंड मानव जातीमध्ये केवळ स्त्री देहालाच मासिक पाळिचे वरदान मिळाले आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का अनेक पुरुषांमध्येही मासिक पाळिची लक्षणं आढळतात. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल पण, एका संशोधनात हे पुढे आले आहे. या संशोधनाच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मासिक पाळीच्या लक्षणांनुसार अनेक पुरुषांमध्ये मासिक पाळी काळात (Menstrual Periods) मनस्थितीत बदल झाल्याचे पाहायला मिळते. पण, पुरुषांना मात्र आपल्यासोबत असे का घडत आहे, याचा उलघडा होत नाही. इंग्रजीत याला पीरियड्स टाइम मूड स्विंग (Periods Time Mood Swings) असेही म्हणतात.
वर दिलेली माहिती वाचून, जर तुम्हाला असे वाटत असेल की आम्ही 'सीक्रेट' पीरियड्स बाबत बोलत आहोत तर, ते पूर्ण चुकीचे आहे. कारण, मासिक पाळी पाळी काळात होणाऱ्या त्रासाला पुरुष कधीच सामोरे गेलेले नसतात. पण, पुरुषांमध्ये असे काही संकेत मिळाले तर, महिलांप्रमाणे त्यांच्यात काही शारीरीक बदल मोठ्या प्रमाणावर दिसत नाहीत. मात्र, त्यांची मनस्थिती मात्र काही प्रमाणात बदलल्याचे पाहायला जरुर मिळते.
पुरुषांमध्येही असतात PMS
सांगितले जाते की, पुरुषांमध्येही मासिक पाळीची लक्षणे दिसतात (Premenstrual Symptoms). एक विशिष्ट प्रकारच्या सिंड्रोममुळे ही लक्षणे दिसतात. सिंड्रोम ज्याला मेन्स सिंड्रोम म्हणूनही ओळखले जाते. हा एक 'इरिटेबल मेल सिंड्रोम' (Irritable Male Syndrome) असतो. ज्यामुळे काही पुरुषांच्या मनस्थितीत बदल होतो. म्हणजेच पुरुषांचा मूड स्विंग होतो. महिलांनाही मासिक पाळी काळात अशाच काहीशा प्रकाराला सामोरे जावे लागते. (हेही वाचा, महिलांनो आता मासिक पाळीच्या काळात रहा कंफर्टेबल; Pads ऐवजी वापरा Period Panties)
'त्या' काळात पुरुष IMS ला सामोरे जातात
'इरिटेबल मेल सिंड्रोम'मुळे 'त्या' काळात पुरुष IMS ला सामोरे जातात. IMS म्हणजे 'इरिटेबल मेल सिंड्रोम' (Irritable Male Syndrome). या काळात पुरुष काहीशा तणाव, चिंता, राग, नैराश्य, थकवा, एकटेपणा अशा भावनांना सामोरे जाताना दिसतात. हे सर्व होण्यामागे बायोकैमिकल चेंजेस असल्याचे वैद्यकीय अभ्यासक सांगतात.
नॅशनल सेंटर फॉर बायॉटेक्नॉलजी इंफॉर्मेशन या संस्थेच्या हवाल्याने सांगायचे तर Irritable Male Syndrome निर्माण झाल्याने घबराट निर्माण होणे ही पुरुषातील एक साधारण गोष्ट आहे. या त्या व्यक्तिला स्वत:लाही कळत नाही की, त्याच्यासोबत नेमके काय होत आहे. या काळात तो चिडचिडेपणा, डिप्रेशन आदींसारख्या गोष्टी अनुभवतो. मेल हॉर्मोन टेस्टोस्टेरोन हे या सर्वांचे मूळ असल्याचे दिसते.