महिलांनो आता मासिक पाळीच्या काळात रहा कंफर्टेबल; Pads ऐवजी वापरा Period Panties
Period Panties (संग्रहित-संपादित प्रतिमा)

निर्माणकर्त्याने मनुष्यजातीचे जितकेही प्रकार बनवले आहेत, त्यामध्ये स्त्रियांना काही विशेष गुण आणि कर्तव्ये बहाल केली. यामध्ये स्त्रीला मिळालेले सर्वात महत्वाचे वरदान म्हणजे मातृत्व. फक्त याच गोष्टीसाठी स्त्री महिन्यातल्या ‘त्या’ चार दिवसांचा त्रास सहन करते. एकेकाळी टॅबू मनाला गेलेला हा विषय आजकाल मोकळेपणाने बोलला जातो. पूर्वी मासिक पाळीकडे (Menstruation Cycle) जसे पहिले जात होते सध्या ती परिस्थिती नाही. त्या चार दिवसांत स्त्रियांचा आराम, त्यांचे मूड स्विंग सांभाळणे, त्यांना काय हवे नको ते पाहणे अशा सर्व गोष्टी पुरुष जातीने करतात. मासिक पाळीमधील स्त्रियांची चीडचीड लक्षात घेऊन ते चार दिवस कंफर्टेबल, आरामदायी जावेत म्हणून आजकाल बाजारात पीरियड पँटी (Period Panties) उपलब्ध आहेत.

वैशिष्ठ्ये -

बाहेर सर्रास अशा पीरियड पँटीजचा वापर केला जातो, मात्र भारतात अजूनही ही संकल्पना रुजली नाही. मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव शोषून घेण्याची 12 टक्के जास्त क्षमता या पीरियड पँटीमध्ये असते. पॅड आणि टेम्पोनच्या तुलनेत याचा वापर अतिशय सोयीस्कर आहे. महत्वाचे म्हणजे या पीरियड पँटीसोबत ज्यादा पॅड्सही मिळतात. तुमचा रक्तस्त्राव जास्त असेल तर तुम्ही पँटीच्या आतमध्ये या पॅड्सचा उपयोग करू शकता. नेहमीची पँटी घातल्यावर जसा फील येतो अगदी तसाच ही पीरियड पँटी घातल्यावर येतो असे मत अनेक महिलांनी नोंदवले आहे.

पॉलीयुरेथन लॅमिनेट आणि अशाच प्रकारच्या लॅमिनेटेड मटेरिअलचा वापर हा पीरियड पँटी बनवण्यासाठी केला जातो. हे कापड वॉटरप्रूफ समजले गेले आहे. त्यामुळे लघवीची समस्या असेल तरीही तुम्ही या पँटी वापरू शकता. पीरियड पँटी या तुम्ही पुन्हा व्यवस्थित धुवून वापरू शकता. मात्र त्यातील पॅड्स तुम्हाला प्रत्येकवेळी बदलावे लागतील. (हेही वाचा: Due Date पूर्वी मासिक पाळी येण्यासाठी 'या' गोष्टी खा!)

फायदे –

  • या पँटीमधून कोणताही दुर्घंध येत नाही. पॅड्सच्या वापरण्याने जो ओलेपणा जाणवतो तो यामध्ये जाणवत नाही.
  • पॅड्सप्रमाणे ही पँटी तुम्हाला वारंवार बदलावी लागत नाही. तसेच ही सरकण्याचीही भीती नाही.
  • याचा द्रव शोषून घेण्याची क्षमता सर्वात जास्त असल्याने लांबच्या प्रवासात तुम्ही याचा सहज उपयोग करू शकता.
  • पॅड्सचा वापर पीरियड्समध्ये जास्तीत जास्त चार तास करता येतो पण पीरियड पँटीचा वापर तुम्ही 12 तासांपर्यंत करू शकता.

सध्या अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर अशा पँटीज उपलब्ध आहेत. तुमचा साईझ आणि आवडत्या रंगानुसार तुम्ही याची खरेदी करू शकता. दरम्यान, ट्रान्सपरन्सी मार्केट रिसर्चने प्रकाशित केलेल्या एका नवीन अहवालानुसार, 2017 मध्ये ग्लोबल पीरियड पॅंटीजचे मार्केट 67.2 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढे होते आणि 2026 पर्यंत ते 279.3 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)