Due Date पूर्वी मासिक पाळी येण्यासाठी 'या' गोष्टी खा!
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

महिलांना येणाऱ्या मासिक पाळीमुळे काही वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. तर मासिक पाळी येण्यापूर्वी कोणते तरी महत्वाचे काम निघते. त्यामुळे काही महिला मासिक पाळी गेल्या महिन्यातील तारखेच्या आधी येण्यासाठी औषधे किंवा गोळ्या घेतात. मात्र असे केल्याने महिलांच्या प्रकृतीवर कालांतराने त्याचा परिणाम जाणवू लागतो. त्यामुळे 'या' काही गोष्टी खाल्ल्याने तुमची मासिक पाळी येण्यासाठी मदत होऊ शकते.

1. भरपूर पपई खा.

जर महिलांना तारखेपूर्वी मासिक पाळी येईल की नाही याची चिंता सतावत असेल तर भरपूर प्रमाणात पपईचे सेवन करा. पपई खाल्ल्याने शरीरात कॅरोटिनचे प्रमाण वाढल्याने एस्ट्रोजेन हॉर्मोन शरीरात वाढतात. त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी तारखेपूर्वी येण्यास मदत होते. तसेच पपई खाल्ल्याने शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढून रक्त संचलन जलद गतीने होते.

2. मधासोबत तिळ खा.

घरगुती उपाय म्हणून मधासोबत तिळ खाल्ल्यास पाळी लवकर येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढून मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते. तर 1 चमचा मध आणि 1 चमचा तीळ असे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा खाल्ल्यास त्याचा परिणाम दिसून येईल. तसेच गेल्या महिन्यातील मासिक पाळी तारखेच्या एका आठवड्याआधी हे मिश्रण खाल्यास उत्तम.

3. गरम पाण्यात हळद टाकून प्या.

हळदीमध्ये फाइटोएस्ट्रॉजेन आढळून येते. जे गर्भाशयातून निघणाऱ्या रक्ताला उत्तेजित करण्यास मदत करते. अशा स्थितीत तुम्हाला पाळी लवकर येण्यासाठी प्रयत्न करत असाल तर एका आठवड्यापूर्वी गरम पाण्यातून हळद टाकून प्या. असे केल्याने नैसर्गिकरित्या तुम्हाला मासिक पाळी येण्याचा परिणाम जाणवू लागेल.

4. डाळींबाचा ज्यूस प्या.

डाळींबाचा ज्यूस रक्त संचलन सुरळीत होण्यास मदत होते. तसेच शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढून मासिक पाळीत येणारे अथडळे दूर करते. तर पाळी येण्यापूर्वी 10 दिवस अगोदर डाळींबाच्या ज्यूसचे सेवन केल्याने हा परिणाम जाणवू शकतो.

वरील काही गोष्टी खाल्ल्याने मासिक पाळी लवकर आल्याचे मानले जाते. तरीही मासिक पाळीबद्दल काही शंका किंवा प्रश्न असल्यास प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानंतरच नैसर्गिक पद्धतीने मासिक पाळी येण्यासाठी या मार्गांचा अवलंब करावा.