दिवाळी संपल्यानंतर काही दिवसांतच तुळशी विवाह पार पडतो. यावर्षी 9 नोव्हेंबरला तुळशी विवाहाला सुरुवात होणार असून 12 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. तुळशी विवाह झाल्यानंतर हिंदू धर्मामध्ये लग्न सराईला सुरुवात होते. विवाह हा जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नासाठी वेगवेगळ्या राशीनुसार मुहूर्त (Zodiac Signs) ठरत असतो.
यंदा काही ठरावीक राशींच्या लोकांसाठी लग्नाचा मुहूर्त अनुकूल आहे. त्यामुळे तुम्ही तुमची रास पाहून लग्नाचा मुहूर्त ठरवू शकता. पुढील काही दिवसांत 12 राशींपैकी कोणत्या राशीची लोक विवाह बंधनात अडकू शकता हे जाणून घेण्यासाठी वाचा हा खास लेख.
हिंदू लग्न हा हिंदूंचा संस्कार सोहळा म्हणूनही ओळखला जातो. विवाहावेळी स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांच्या साक्षीने पती-पत्नी म्हणून ओळखले जातात. विवाह हा हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारापैकी एक आहे. विवाह झाल्यानंतर पती-पत्नी एकत्र नवीन आयुष्याला सुरुवात करतात. (हेही वाचा - Tulsi Vivah 2019: वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी करा ‘ही’ कामे)
यंदा ‘या’ राशीचे लोक अडकू शकतात विवाहबंधनात -
मेष: या राशीच्या लोकांसाठी यंदा लग्न करण्याची योग्य वेळ आहे. तुमचे लग्न झाल्यानंतर तुमची नोकरी आणखी सुरक्षित होईल. तसेच तुम्हाला भविष्यात आणखी यश प्राप्ती होईल. त्यामुळे यंदा लग्न करणं तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे.
वृषभ: जर आपण कोठे गुंतवणूक केली असेल, तर लग्न करण्याच्या योजनेस उशीर करू नका. आपल्याकडे एक सुरक्षित नोकरी आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त लग्न करू शकता.
मिथुन: या राशींच्या लोकांसाठी यंदा चांगला मुहूर्त आहे. त्यामुळे तुम्ही लग्न पुढे ढकलत असाल तर असं करू नका. तुमच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुम्ही विवाहबंधनात अडकल्यास तुम्ही अधिक आनंदी राहू शकता.
कर्क: या राशींच्या लोकांसाठी ही लग्नाची योग्य वेळ आहे. त्यामुळे बिनधास्त आपल्या जोडीदाराची कुंडली पाहुन योग्य मुहूर्त ठरवा. तुमचे लग्न झाल्यानंतर घरात पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सुसंवाद निर्माण होईल.
सिंहः तुम्हाला जर कोणी आवडत असेल, तर त्या व्यक्तीला प्रपोज करण्याची ही योग्य वेळ आहे. विशेष म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून होकार आल्यास वैवाहिक जीवनात चांगली नातं तयार होईल. त्यामुळे आता आणखी उशीर करू नका.
कन्या: लग्नासारखे महत्त्वाचे निर्णय स्वतः घेतल्याबद्दल आपण थोडसे संभ्रमित असाल, तर आपल्या कुटुंबावर विश्वास ठेवा. त्यांनी सांगितलेल्या मुलीच्या नावाला होकार द्या आणि बिनधास्त लग्नगाठ बांधा.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे अनेकदा सर्व गोष्टींचा विचार करून हा सोहळा पार पाडला जातो. लग्न जमवताना स्त्री आणि पुरुषाची पत्रिका पाहिली जाते. त्या दोघांच्या जन्मवेळेवर त्यांचे गुण ठरवले जातात. योग्य गुण मिळत असल्यास त्यांचा विवाह केला जातो.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)