Cheating husband (Photo Credits: File Photo)

समाजात आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, ज्याची कल्पना करवणे हे मुश्कील आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) येथे असेच एक प्रकरण समोर आले आहे. ऑस्ट्रेलिया येथे राहणारी 27 वर्षीय महिला आपल्या पतीला अतिशय निष्ठावंत समजत होती. तिचे आपल्या पतीवरही तितकेच प्रेम होते. मात्र जेव्हा तिला समजले, गेल्या सहा वर्षांपासून तिच्या पतीचे आणि तिच्या आईचे शारीरिक संबंध आहेत तेव्हा अक्षरशः तिच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर आलेल्या या परिस्थितीमुळे पूर्णतः हादरून गेलेल्या या महिलेने, एका टीव्ही शो मध्ये या  या प्रकरणाबाबत लोकांचा सल्ला मागितला आहे.

जेव्हा तिने तिच्या आईला याबाबत विचारले तेव्हा तिच्या आईने हे आरोप फेटाळून लावले. याबाबत ती कोणतेही स्पष्टीकरण देऊ शकली नाही. स्वतःचा बचाव करण्याचा तिने पूर्णतः प्रयत्न केला, मात्र आता सत्य समोर आल्यावर त्याचा काहीच उपयोग झाला नाही. (हेही वाचा: पार्टनरचे बाहेर अफेअर असल्याचा संशय आहे? जाणून घ्या का ठेवले जातात विवाहबाह्य संबंध)

याधीही या महिलेच्या पतीचे तिच्या मैत्रिणीसोबत अफेअर होते. ही गोष्ट माहित असूनही या महिलेने आपल्या पतीवर विश्वास ठेवला होता. मात्र आपल्या आईसोबत त्याचे शारीरिक संबंध असतील असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु पतीचा भूतकाळ पाहता तिला असलेला संशय खरा ठरला.