Husband Wife Relationship: लैंगिक संबंधापासून वंचीत ठेवतो, Sex कर म्हणताच मारहाण करतो; पतीविरोधात पत्नीची तक्रार
Relationship | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

लैंगिक संबंधांपासून (Physical Relationship) वंचित ठेवल्याचा आरोप करत एका 24 वर्षीय महिलेने पोलीस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदर महिला उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील कानपूर (Kanpur) येथील आहे. तिने अहमदाबाद (Ahmedabad) जवळील साबरमती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रातीत तिने पतीने आपल्याला लैंगिक संबंधांपासून दूर ठेवल्याचा आरोप तर केलाच. परंतू, लैंगिक संबंधांविषयी विचारले असता आपल्याला मारहाण केल्याचेही तिने म्हटले आहे.

पीडितेने तक्रारीत पुढे म्हटले आहे की, पतीने तिला लैंगिक संबंधांपासून दूर ठेवत तिच्यावर अन्याय केलाच. परंतू, तिला मारहाण करत माहेरकडून पैसे आणण्यासाठी दबावही टाकला. तक्रारदार महिलेचा विवाह साबरमती येथील व्यक्तीसोबत 2018 मध्ये झाले होते. लग्नानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणांवरुन भांडणे सुरु झाली. जी पुढे वाढतच गेली. या मलिलेला तिच्या पतीने जानेवारी 2021 मध्ये सोडून दिले. नंतर ती कानपूर येथे तिच्या माहेरी वास्तव्यास आली. समाजातील नेत्यांनी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांच्या भांडणात हस्तक्षेप केल्यानंतर आणि समझोता घडवून आणल्यानंनतर आरोपीने तिला फेब्रुवारी 2020 मध्ये परत नांदविण्यास नेले आणि त्यांना आश्वासन दिले की तो तिला पुन्हा त्रास देणार नाही. मात्र, समझोता घडूनही त्यांच्यातील भांडणे थांबलीच नाहीत. पुढेही ती वाढतच गेली. (हेही वाचा, Unnatural Sex: पत्नीच्या गुप्तांगाला चावणाऱ्या पतीची दातकवळी कोर्टाकडून जप्त, खटलाही सुरु)

पिढीतेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की तो तिला अनेकदा मारहाण करायचा आणि तिला तिच्या पालकांकडून पैसे मागायला सांगायचा. “एकदा जेव्हा त्याने माझ्या आई-वडिलांना पैसे मागितले तेव्हा मी त्याला म्हणालो की त्याने लग्नापूर्वी तसे करायला हवे होते. यावर त्याने मला रागाच्या भरात त्याने मला बेदम मारहाण केली. त्या वेळी माझ्या सासूनेच मला वाचवले,” असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिला तक्रारीत पुढे सांगते की, “फेब्रुवारी 2020 पासून आमचे शारीरिक संबंध नाहीत. प्रत्येक वेळी जेव्हा मी जवळीक साधण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तो मला मारहाण करायचा.” केवळ लग्न वाचवण्यासाठी मी त्याच्यासोबत राहत असल्याचे तिने म्हटले आहे.शनिवारी तिचे आई-वडील आले असता आरोपीने त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि तिला पुन्हा मारहाण केली. त्यामुळे तिने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली.