अनैसर्गिक सेक्स (Unnatural Sex) करण्यासाठी पत्नीवर दबाव टाकणाऱ्या आणि अशा सेक्सवेळी तिच्या गुप्तांगासह (Genitals) सर्वांगाला चावे घेणाऱ्या पतीची दातकवळी (Dentures ) न्यायालयाने जप्त केली आहे. घटना आहे मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील इंदौर (Indore) येथील. इथल्या एका महिलेने दिलेल्या तक्रीरीवरुन पतीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण पुढे न्यायालयात गेले. महिलेने केलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असल्याचे सांगत न्यायालयाने पतीविरोधात आदेश दिले. प्राप्त माहितीनुसार, पतीचे वय पत्नीपेक्षा 27 वर्षांनी अधिक आहे.
महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, पतीला अनैसर्गिक सेक्स करण्याचे व्यसनच आहे. लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने महिलेला अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती केली. तिने जेव्हा नकार दिला तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने अनैसर्गिक सेक्स तर केलाच परंतू, त्याने तिच्या सर्वांगाला चावेही घेतले. त्याचे वय अधिक असल्याने त्याच्या तोंडात दात नाहीत. त्यामुळे तो दातकवळी वापरतो. त्याने सेक्स करताना तिच्या गुप्तांगालाही चावे घेतले. पतीच्या या सततच्या विक्षिप्त वागण्याने पत्नी अत्यंत त्रस्त झाली. अखेर रोजचाच हा त्रास सहन न झाल्याने तिने माहेरी पळ काढला आणि गुजरातवरुन इंदौरला येत पतीविरोधात गुन्हा दाखल केला. आपल्या तक्रारीच्या माध्यमातून तिने पोलिसांना तिच्यावर ओढावलेली स्थिती कथन केली. (हेही वाचा, MSRTC Strike: एसटी कर्मचाऱ्यांबाबत मोठ्या घोषणेची शक्यता, परिवहन मंत्री अनिल परब यांची सायंकाळी पत्रकार परिषद)
पत्नीने पोलिसात गुन्हा आणि न्यायालयात तक्रार दाखल केल्याचे समजताच पती अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात पोहोचला. मात्र, खटल्यातील गांभीर्य आणि गुन्हा याचा विचार करुन न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. पीडितेच्या झालेल्या वैद्यकीयत तपासात तिच्या शरीरावर दाताचे व्रणही आढळून आले.त्यामुळे न्यायालाने आदेश देऊन पतीची कवळीच जप्त केली. महिलेने न्यायालयाला विनंती केली की, पतीला शक्य तितकी कठोर शिक्षा द्यावी. पोलिसांनी आरोपीला अटक करुन जिल्हा न्यायालयात हजर केले होते.
महिलेने तक्रारीत अधिक माहिती देताना म्हटले आहे की, तिचा हा दुसरा विवाह होता. याआधी तिचा तलाख झालेला असून तिने गुजरातमधील एका मोठ्या ज्वेलरशी विवाह केला. तिचा दुसरा पती (ज्वेलर) हा तिच्याहून तब्बल 27 वर्षांनी मोठा आहे. त्याचे वय 67 वर्षे आहे. या ज्वेलरने संबंधित महिलेला सांगितले की, त्याच्या पहिल्या पत्नीचे ऑक्टोबरमध्ये कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याने निधन झाले आहे. त्यामुळे सध्या तो एकटाच राहतो. त्याच्यावर विश्वास ठेऊन तिने त्याच्यासोबत विवाह केला.