पत्नीशी अनैसर्गीक संभोग (Unnatural Sex With Wife) जबरदस्तीने करणे हे कायद्याच्या चौकटीत गंभीर गुन्हा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पत्नीशी तिची सहमती नसताना अनैसर्गिक संभोग (Unnatural Sex) करणे हे अतीशय भयंकर आहे. त्यामुळे पत्नी आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी (27 नोव्हेंबर) एका व्यक्तीस जामीन नाकारला. संबंधित व्यक्ती हा पीडित महिलेचा पती आहे. तसेच, तो हुंड्यासाठी पत्नीची छळवणूक, कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार अशा विविध आरोपांखाली दोन वर्षांपासून अधिक काळ कारागृहात आहे.
पीडितेच्या भावाने पतीविरोधात 2019 मध्ये हरियाणा राज्यातील भीवानी जिल्ह्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी भादंसं कलम 148, 149, 323, 377 आणि 306 अन्वये गुन्हा तक्रार दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायमूर्ती एन व्ही रमन आणि न्यायाधीश सूर्य कांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने पीडितेचा पती प्रदीप याला जामीन देण्यास नकार दिला. प्रदीप याने पत्नीच्या कुटुंबीयांना हंड्यासाठी त्रास दिला होता. तसेच, पत्नीसोबत अप्राकृतिक सेक्स करुन तिचा छळ केला होता. (हेही वाचा, बेळगाव: कुत्र्यासोबत सेक्स करण्यासाठी बायकोवर दबाव; विकृत नवऱ्याला 10 वर्षांचा तुरुंगवास[Poll ID="null" title="undefined"])
सीजेआयच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत कोर्टाने सांगितले की, कलम 377 (बलात्कार) ही एक अत्यंत गंभीर घटना आहे. त्यामुळे आरोपी पती हा कोणत्याही प्रकारे सहानुभूतीस पात्र नाही. पोलीस काय करतात हे आम्हाला माहिती नाही. आपण हुंडा मागण्यास सुरुवात केली. जेव्हा ती मागणी पत्नी आणि तिचे कुटुंबीय पूर्ण करु शकले नाहीत तेव्हा आपण तिच्याशी (पत्नी) अप्राकृतीक सेक्स केलात. अनैसर्गिक संभोग करुन आपण एक प्रकारे तिचा छळच केला. इतकेच नव्हे तर अत्यंत खासगी अशा संबंधाचे चित्रण करुन आपण ते व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. त्यातून पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलात. हे सर्वच गंभीर आहे. त्यामुळे तुमच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली. त्यामुळे अशा गंभीर गुन्हात आपण कोणत्याही प्रकारे जामीन मिळविण्यास अथवा सहानुभूती दर्शवण्यास पात्र नाही, असे सांगून न्यायालयाने सदर पतीचा (आरोपी) जामीन नाकारला.