Maharashtra Bendur 2020 HD Images: भारत हा कृषिप्रधान देश आहे, भारतातील जवळजवळ सर्व सण हे शेतीशी संबंधित आहेत. यामध्ये बेंदूर (Maharashtra Bendur 2020) किंवा बैल पोळा (Bail Pola) या सणांना तर विशेष महत्व आहे. बेंदूर हा खास बैलांसाठीचा उत्सव तसेच शेतकर्यांना उत्साहीत करणारा असा हा सण आहे. पोळा हा उत्सव प्रदेशानुसार आषाढ, श्रावण वा भाद्रपद मासात साजरा केला जातो. महाराष्ट्रात यंदा या उत्सव, शनिवारी 4 जुलै रोजी साजरा होत आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, या दिवशी बैलांचा थाट असतो, त्यांना कामापासून आराम असतो. या दिवशी बैलांना एखाद्या राजाप्रमाणे वागणूक मिळते.
प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी बेंदूर हा सण अतिशय महत्वाचा आहे. बेंदूरच्या दिवशी बैलांना न्हाऊ घालतात. काही ठिकाणी खांदेमळणी केली जाते. खांदेमळणी करताना गरम पाण्याने बैलांचे खांदे धुतले/शेकले जातात. बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. त्यानंतर त्यांना पंचारती ओवाळतात. पुरणपोळ्यांचा नैवद्य दाखवितात. शिंगाना हिंगूळ व बेगड लावतात. गळ्यात सुंदर माळा आणि पायात घुंगरूदेखील बांधतात. संपूर्ण शरीरावर सुंदर नक्षीकाम करून पाठीवर रंगीबेरंगी झुल टाकतात. अशाप्रकारे एका नव्या नवरीप्रमाणे बैलांचा या दिवशी थाट असतो. हा उत्सव साजरा केल्याने शेतात भरपूर धान्य पिकते आणि गोधन वाढते, असा समज आहे.
तर अशा या बेंदूर सणाच्या शुभेच्छा तुम्ही Wishes, Images, WhatsApp Status, Messages, HD Images च्या माध्यमातून देऊ शकता.
बेंदूर सणाच्या शुभेच्छा!
बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा!
बैल पोळ्याच्या शुभेच्छा!
बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
शेतकरी बांधवांना बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
(हेही वाचा: Maharashtra Bendur 2020 Date: महाराष्ट्रातील बेंदूर सण माहिती, महत्व, साजरा करण्याची पद्धत)
दरम्यान, बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात नेले जाते. सर्व शेतकरी आपापल्या जोडया घेउन एका ठिकाणी एकत्र येतात. त्यानंतर गावातून बैलांची मिलारवून काढली जाते. मात्र सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता घरातच बैलांची पूजा होणार आहे. ज्या घरात बैल नसतील असे लोक मातीच्या बैलांची पूजा करून हा दिवस साजरा करतात.