घरात फिशटँक ठेवत असाल, तर चुकूनही दुर्लक्षित करु नका या '5' गोष्टी
Fish Tank (Photo Credits: Instagram)

निळ्याशार अथांग समुद्रात स्वच्छंदी मनाने तरंगणारे मासे आपल्याला रोज दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे अनेकांना घरात फिशटँक (Fish Tank) ठेवण्याची आवड असते. पाण्यामध्ये तरंगणा-या त्या माशांना पाहण्याची मन लहान मुलांसोबत मोठ्यांनाही असतेच की. घरात फिशटँक ठेवणे हे घरासाठी शुभही मानले जाते असे म्हणतात. मात्र हे फिशटँक ठेवताना अनेक गोष्टींची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कारण शेवटी समुद्राच्या तळाशी अगदी मनसोक्तपणे तरंगणा-या तुम्ही एका पाण्याच्या टँकमध्ये आणून ठेवलाता, तर त्याच्या स्वच्छंदी तरंगण्यावर एक प्रकारची गदा आणणे असेच आहे. त्यामुळे ब-याचदा फिश टँकमध्ये मासे टाकल्यानंतर त्यांना बाजूकडील वातावारण पूरक न ठरल्याने मासे मरतातही.

म्हणूनच जर तुम्ही घरात फिशटँक आणू इच्छिता तर काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तसे केल्यास मासे जिवंतही राहतील आणि फिशटँक ठेवण्याची इच्छा ही पूर्ण होते.

फिशटँक संबंधी '5' महत्त्वाच्या गोष्टी:

1. फिशटँकमध्ये नेहमी शिळं पाणी वापरावं. हे पाणी स्वच्छ पण 2-3 दिवसाचे असावे

2. फिशटँकमधील पाणी बदलताना त्यात आधीच 40% पाणी वापरावे. आणि उर्वरित पाणी हे 2-3 दिवसाचे स्वच्छ पण शिळं पाणी असावं. कारण माशांना नवीन पाण्याच्या तापमानाशी लगेच जुळवून घेता येत नाही किंबहुना त्यांच्या शरीरातील उष्णता त्या गोष्टीसाठी पूरक नसते. अशावेळी आधीच 40% पाणी त्यात वापरल्यास त्यांच्या शरीरातील तापमान त्या तापमानाशी जुळवून घेते त्यामुळे मासे दगावण्याची शक्यता कमी होते. न्यूयॉर्कमधील एका महिलेने पकडला दोन तोंडांचा मासा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

3. घरातील फिश टँकमध्ये साधारणत: 9 मासे असावेत. त्यात एक काळा मासा व इतर गोल्ड फिश असावेत. गोल्डफिश हा समृद्धी देणारा मासा मानला जातो.

4. घराच्या मुख्य दाराजवळ कधीही फिशटँक ठेवू नये. त्यामुळे घरातील पुरुष व्यभिचारी बनण्याची शक्यता असते.

5. घरात फिश टँक हे नेहमी हवेशीर आणि स्वच्छ ठिकाणी असावे. तसेच फिश टँकमध्ये तळाशी काही दगड, गोटे ठेवाव्यात. जेणेकरुन त्यांना समुद्रात असलेल्या सागरगोटे, दगडी, शंख-शिंपले यांसारख्या सागरी खजिन्यांमध्ये असल्याचे वाटते. ज्यामुळे ते फिश टँकमध्येही आनंदी मनाने विहार करतात.

फिशटँक घरात ठेवल्याने घरात भांडणे कमी होतात. तसेच फिश टँकमधील माशांना पाहिले तर आपला राग शांत होतो आणि रक्तदाबही व्यवस्थित राहते, अशीही काही शास्त्रीय कारणे आहेत. ह्यावर किती विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मुळात या जलचरांना जिवंत ठेवणे आणि त्याची काळजी घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे.