न्यूयॉर्कमधील (New York) एक जोडप तलावात मासे पकडण्यासाठी गेले असता, त्यांच्या ते गळाला लागले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. यात त्या जोडप्याला लागला दोन तोंडांचा मासा (Two Mouth Fish). हा मासा पाहताच त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. NBC News ने दिलेल्या रिपोर्टनुसार, डेबी गेडेस हिने हा मासा पकडला असून या माश्याचे फोटो सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहेत. चॅम्प्लेन लेक असे या तलावाचे नाव असून डेबी गेडेसने हा मासा पकडताच त्याचे त्वरित फोटो काढून त्याला पाण्यात सोडून दिले.
डेबी गेडेस आपल्या पतीसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी चॅम्प्लेन लेकजवळ गेली होती. तिथे मासे पकडत असताना तिला हा दोन तोंडांचा मासा सापडला. डेबी सांगते की, "जेव्हा आम्ही हा मासा पकडला तेव्हा आमचाआमच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की हा 2 तोंडांचा मासा असूनही खूप स्वस्त आणि छान आहे."
नॉटी बायज फिशिंगने हे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. नॉटी बॉयज यांनी हे फोटो अपलोड करत लिहिलं होतं की, 'आमची सहकारी डेबी गेडेस यांनी काही दिवसांआधी चॅम्प्लेन येथून दोन तोंडाच्या मासा पकडला होता.'
हेही वाचा- व्हर्जिनियात सापडला दोन तोंडाचा साप; सोशल मीडियावर युजर्सच्या तोंडून अगंबाई... अरेच्छा..!
Knotty Boys Fishing ने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केल्यानंतर आतापर्यंत 6,000 पेक्षा जास्त लोकांनी हे फोटो शेअर केले असून 1000 च्यावर यावर कमेंट्स आले आहेत.