Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 27 फेब्रुवारी 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today

Horoscope Today 27 February 2024 in Marathi: आजचे राशीभविष्य,मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: आज मेष राशीच्या व्यक्तींची प्रकृती अस्थिर असेल. आज तुम्हाला थोडासा मानसिक ताण असेल. मात्र तुमच्या मेहेनतीमुळे तुम्हाला यश प्राप्त होईल. तुमच्या नोकरीमध्ये चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे करिअरमध्ये वरची पातळी गाठण्यासाठी तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल.

शुभ उपाय- सकाळी उठून पूजा करून गणेशाला दुर्वा वाहा.

शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा

शुभ अंक- 1

शुभ रंग- निळा

वृषभ: आजचा दिवस मेहनतीचा दिवस आहे, याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. आर्थिक परिस्थितीत चढ-उतार राहील. अचानक अनेक अनावश्यक खर्च उद्भवतील. व्यवसायाला गती प्राप्त होण्याऱ्या घटना घडण्याची शक्यता. आज जोडीदाराशी पारदर्शक वर्तणूक ठेवणे आवश्यक आहे.

शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे.

शुभ दान- गरजूला उडीद, मूग आणि तूर डाळ दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- आकाशी

मिथुन: मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज खाण्यापिण्याच्या सवयींवर विशेष लक्ष ठेवा. पोषक आहार घ्या. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. आज तुम्ही तुमच्या करिअरबाबत अधिक गंभीर असाल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, पण त्याचबरोबर तुमचे खर्चही वाढण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- गरजूला धातूचे दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- केशरी

कर्क: आज कर्क राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. करियरचे नवे मार्ग तयार होतील. आर्थिक परिस्थिती बळकट असेल. घरच्या मंडळींचे सल्ले फायद्याचे ठरतील. नवीन गुंतवणूक करताना विचार करा.

शुभ उपाय- वाहत्या नदीमध्ये नाणे सोडा

शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पिवळा

सिंह: आज सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील. मेहेनत घेतली तर करिअरमध्ये प्रगती करू शकाल. तुम्हाला तुमच्या कामाच्या बाबतीत एकाग्र होण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठांचा सल्ला हितकारक ठरेल. व्यवसायातील नव्या कल्पना तुमचा आर्थिक नफा वाढविण्यास मदत करतील.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- पांढरा

कन्या: आज आर्थिक व्यवहार आणि करिअरच्या दृष्टीने उत्तम दिवस. आरोग्याच्य बाबतीत मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. समाजामध्ये प्रतिष्ठा उंचावेल अशी एखादी घटना घडण्याची शक्यता. भांडवली गुंतवणू नीट विचार करून करा.

शुभ उपाय- सकाळी सूर्याला अर्घ्य द्या.

शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- गुलाबी

तुळ: आज कामाच्या ठिकाणी तुम्ही दाखविलेल्या चिकाटीमुळे तुमची एक नवी ओळख निर्माण होईल. तुम्हाला नव्या कार्यालयात काम करण्याची संधी मिळेल. आज आर्थिक परिस्थितीबाबत तुरळक आव्हाने तुमच्या समोर येतील. प्रेमजीवनात समस्या उद्भवतील त्यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची किंवा गैरसमज होऊन नात्यात कडूपणा येण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- पिठाचे दान करा

शुभ अंक- 7

शुभ रंग- पोपटी

वृश्चिक: आज करिअरमध्ये संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. व्यवसायात नव्या संधी चालून येतील. संवादकौशल्यामुळे व्यावसायिक यश प्राप्त होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सामान्यापेक्षा अधिक चांगली राहील. आज नोकरी/व्यवसायामुळे तुम्हाला घरापासून लांब प्रवास करावा लागेल.

शुभ उपाय- पांढरे वस्त्र परिधान करा

शुभ दान- पांढऱ्या रंगाची वस्तू अथवा वस्त्र दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- लाल

धनु: आज दीर्घकाळापासून त्रास देणाऱ्या आजारांपासूनही आराम मिळेल. करिअरमध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतील. नव्या कल्पना तुम्हाला यश मिळवून देतील. आज तुम्ही नवे नाते जोडाल. जोडीदाराशी असलेले तुमचे नाते परिपूर्ण असेल. आज आनंदी असाल आणि गृहसौख्य लाभेल.

शुभ उपाय- गायीला चारा द्या.

शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.

शुभ अंक-3

शुभ रंग- हिरवा

मकर: आज तुम्हाला आर्थिक बाबतीत संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. अनेक चढ-उतारांनी भरलेला दिवस असेल. प्रेम जुळून येण्याची संधी आहे आणि नात्याची वीण अधिक घट्ट होईल. मित्रांची साथ लाभेल. डोळे झाकून कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.

शुभ उपाय- मंदिरात तेलाचा दिवा लावा.

शुभ दान- धान्य दान करा

शुभ अंक- 4

शुभ रंग- करडा

कुंभ: आज प्रवासामुळे थकवा जाणवेल. वाहन सांभाळून चालवा. करिअरचा विचार करता तुम्हाला संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. कुटुंबियांकडून तुम्हाला मदत होईल. जोडीदाराशी काही वाद झाले तरी ते वाढवू नका, उलट चर्चेने ते वाद सोडवा. कुटुंबियांची प्रकृती उत्तम राहील. आई-वडिलांच्या प्रकृतीच्या बारीकसारीक कुरबुरी राहतील.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- पक्ष्यांना दाणे द्या

शुभ अंक- 7

शुभ रंग- जांभळा

मीन: मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम. आज आरोग्य चांगले राहील. दूरचा प्रवास टाळा. आज खर्च वाढण्याची शक्यता आहे, मात्र उत्पन्नातही वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी व्यवस्थापनाकडून प्रशंसा होईल. जोडीदाराची साथ लाभेल

शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे.

शुभ दान- वस्त्रदान करा

शुभ अंक- 9

शुभ रंग- लाल