Horoscope Today 2nd March 2024 in Marathi: आजचे राशीभविष्य, शनिवार 2 मार्च 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
मेष (Aries Horoscope Today): आजचा दिवस संमिश्र असेल. मात्र दैवाचे पाठबळ उत्तम राहण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी तसेच घरात तणाव जाणवेल. व्यवसायाच्या ठिकाणी गोड बोलून काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे तुमच्या मनात येईल. वडीलधाऱ्यांच्या वयाचा मान रखाल.
शुभ उपाय- सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्या.
शुभ दान- अन्नदान करा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- लाल
वृषभ (Taurus Horoscope Today): आज काही घरगुती प्रश्नांत लक्ष देणे तुम्हाला अत्यंत गरजेचे वाटेल. अनावश्यक खर्चाचे प्रमाणही वाढेल. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. वादविवाद-भांडण टाळा. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल.
शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.
शुभ दान- गरजूला धातूचे दान करा.
शुभ अंक- 5
शुभ रंग- पांढरा
मिथुन (Gemini Horoscope Today): आज कोणतीच गोष्ट सहज साध्य होणार नाही. मात्र आजच्या कष्टांचे भविष्यात नक्कीच फळ मिळेल. स्वतःच्या आयुष्याची दुसऱ्यांची तुलना करणे टाळा. आत्मपरीक्षण करून भावनेच्या आहारी न जाता व्यवहार्य निर्णय घ्या.
शुभ उपाय- वाहत्या पाण्यात नारळ सोडा.
शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- लाल
कर्क (Cancer Horoscope Today): नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. व्यावसायिकांना धंद्यात वाढ दिसेल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. पोटाच्या किंवा डोळ्याच्या समस्या उद्भवतील.
शुभ उपाय- शंकराच्या पिंडीला बेल-गंध वाहा.
शुभ दान- कोणत्याही काचेच्या वस्तूचे दान करा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- हिरवा
सिंह (Leo Horoscope Today): आजचा दिवस अनुकूल आहे. आज अत्यंत उत्साहाने दिवसाची सुरुवात कराल. सर्व कामे आज विना व्यत्यय पार पडतील. मात्र नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकार्यांशी संबंध बिघडू नयेत याची काळजी घ्यावी. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने मन आनंदित राहील.
शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.
शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- केशरी
कन्या (Virgo Horoscope Today): आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या. जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. आज जिभेवर ताबा ठेवल्यास जोडीदाराची उत्तम साथ लाभू शकते.
शुभ उपाय- सूर्याला जल अर्पण करा.
शुभ दान- अन्नदान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- निळा
तुळ (Libra Horoscope Today): दिवस संमिश्र जाईल. आजचा दिवस खर्चाचा आहे. तुम्हाला काटकसर जमणार नाही. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. व्यापाऱ्यांनी सांभाळून व्यवसाय करावा. जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता.
शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे.
शुभ दान- वस्त्रदान करा
शुभ अंक- 2
शुभ रंग- गुलाबी
वृश्चिक (Scorpio Horoscope Today): सरकार दरबारी असलेली कामे रखडतील. मात्र आज मनोबल उत्तम असल्याने तुम्ही कार्यक्षेत्रातील आव्हाने सकारात्मकतेने स्वीकाराल. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. आळशीपणामुळे कोणतेही महत्वाचे काम टाळू नका.
शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.
शुभ दान- पक्ष्यांना दाणे द्या.
शुभ अंक- 7
शुभ रंग- करडा
धनु (Sagittarius Horoscope Today): आज नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, जिचा भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक आणि आर्थिक समस्या कमी होण्यास मदत मिळेल. एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे.
शुभ उपाय- मंदिरात तेलाचा दिवा लावा.
शुभ दान- धान्य दान करा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- जांभळा
मकर (Capricorn Horoscope Today): आज कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील. ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील.
शुभ उपाय- गायीला चारा द्या.
शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- लाल
कुंभ (Aquarius Horoscope Today): मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा. पाण्यापासून आज दूर रहा. आज निर्माण झालेले भावनिक नाते भविष्यात उपयोगी पडेल. पैशांच्या गुंतवणुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
शुभ उपाय- पांढरे वस्त्र परिधान करा.
शुभ दान- पांढऱ्या रंगाची वस्तू अथवा वस्त्र दान करा.
शुभ अंक- 5
शुभ रंग- पांढरा
मीन (Pisces Horoscope Today): महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. नोकरी अथवा व्यवसायामधील अडकलेले काम पूर्ण होईल. एखादा नवीन विषय शिकून घेण्याकडे आज तुमचा कल असेल. जवळचे लोक गैरफायदा घेण्याची शक्यता त्यामुळे सावध रहा.
शुभ उपाय- सूर्याला अर्घ्य द्या.
शुभ दान- पिठाचे दान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- हिरवा