डिसेंबर महिना सुरु झाला असून हळूहळू थंडीलाही सुरुवात होऊ लागलीय. थंडी सुरु झाली की महिलांना काय तर पुरुषांनाही केसांबाबतीत सर्वात मोठी समस्या निर्माण होते ती केसांत कोंडा (Dandruff) होण्याची. यामुळे केसांत खाज येणे, केस गळणे, केस पातळ होणे यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. थंडीत केसात कोंडा होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली डोक्याची त्वचा कोरडी पडणे किंवा तेलकट होणे. यासोबत केस स्वच्छ न धुणे, योग्य आहार न घेणे, कोणत्या तणावाखाली असल्यासही केसांत कोंडा होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीत फार भूक लागते अशा वेळी कधी कधी आपला आपल्या जिभेवर ताबा राहत नाही आणि त्यादरम्यान आपण आपल्या शरीरास योग्य नसलेले पदार्थही आपण खातो. ज्याचा परिणाम आपल्या केसांवर दिसायला सुरुवात होते.
यात केसातील कोंडा ही समस्या प्रकर्षाने जाणवायला लागते. अशावेळी आपण केसांच्या काळजीपायी केमिकल्सयुक्त उत्पादने केसांना लावतो ज्यांचा कधीकधी विपरित परिणामही होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांमधील कोंडा कमी होण्यासाठी काही घरगुती टिप्स देणार आहोत.
1) लसूण
कोंड्यावर लसूण अतिशय फायदेशीर ठरते. लसणात अॅलेसेन म्हणून एक घटक आहे जो कोंड्यावर उपाय करण्यासाठी फार उपयुक्त ठरतो. लसणाची एखादी पाकळी कापून त्याचा रस करुन केसांच्या स्काल्पला लावला पाहिजे. त्यानंतर 15-20 मिनिटांनी केस धुऊन घ्यावेत. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल लसणाच्या रसामध्ये थोडंस मध लावूनही ते केसांना लावू शकतो.
हेदेखील वाचा- Winter Lips Care Tips: हिवाळ्यात या '5' घरगुती उपायांनी घ्या गुलाबी ओठांची काळजी
2) दही
कोंड्यावर दही गुणकारी ठरते. आठवड्यातून 3-4 वेळा आंघोळीच्या 20-25 मिनिटे आधी डोक्याच्या त्वेचला दही लावून चांगला मसाज करावा आणि त्यानंतर केस चांगले धुऊन घ्यावेत.
3) लिंबाचा रस
केस धुतल्यानंतर थोड्या पाण्यात लिंबाचा रस टाकून त्या पाण्याने केस धुतल्याने केसातील चिकटपणा आणि तेलकटपणा निघून जाईल. यामुळे केसातील कोरडेपणा, चिकटपणा निघून जाईल आणि कोंडा ही कमी होईल.
4) मेथीचे दाणे
मेथीचे दाणे रात्री रात्री भिजत ठेवावे आणि सकाळी त्याची पूड करून त्याची पेस्ट बनवावी. हे मिश्रण केसांना लावून अर्ध्या तासाने केस धुवावे. थंडीत कशा पद्धतीचा मेकअप कराल; मेकअप आर्टिस्ट विनायक वरदे यांच्याकडून माहित करून घ्या काही खास टिप्स
5) शहाळ्याचे पाणी
कोंड्यामुळे केसातील तेलकटपणा वाढत असेल तर केसांना तेलाऐवजी शहाळ्याचे पाणी लावावे. यामुळे केसांतील कोंडा दूर होईल आणि तुमचे केस मुलायम आणि बळकट होईल.
या नैसर्गिक उपायांनी केसांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही आणि तुमची केसात कोंडा होण्याची समस्या देखील दूर होईल.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)