Rosy Lips (Photo Credits: PixaBay)

हिवाळा (Winter) सुरु झाला त्वचा कोरडी पडणे, रुक्ष होणे, पांढरी पडणे या समस्या सुरु होतात. यात थंडीचा सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या गुलाबी ओठांवर.. थंडीमुळे ओठ वारंवार कोरडे पडतात. अशा वेळी आपण अनेक प्रकारचे लिपबाम लावून ओठ कोरडे पडणे, फाटणे यांसारख्या अनेक समस्यांचे निराकरण करतात. पण कधी कधी ती लिपबाम खरेदी करणे एखाद्याला परवडत नाही. किंवा ती प्रोडक्ट्स उपलब्ध होत नाही किंवा स्वत:जवळचे लिपबाम संपलेले असते. अशा वेळी त्वरित काय उपाय करता येतील या प्रयत्नात आपण असतो.

तुम्हाला पडणा-या या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आम्ही आज तुम्हाला असे 5 घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे थंडीमुळे कोरडे पडणारे तुमचे ओठ पुन्हा पहिल्यासारखे गुलाबी आणि मऊ होतील. थंडीत कशा पद्धतीचा मेकअप कराल; मेकअप आर्टिस्ट विनायक वरदे यांच्याकडून माहित करून घ्या काही खास टिप्स

1. हिवाळ्यात रोज रात्री झोपताना लोणी किंवा तूप लावून ठेवल्यास ओठ मऊ होतात.

2. लोणी आणि मीठ एकत्र केल्याने ओठांवरील मृत त्वचा निघून जाते आणि ते जास्त काळ तकतकीत आणि मऊ राहतात.

3. शेंगदाण्याच्या तेलाने ओठांवर मसाज करुन त्यानंतर सुती कापडाने ते पुसावे. यामुळे ओठ मऊ पडतात. Winter Hair Care Tips: हिवाळ्यात 'अशी' घ्या केसांची काळजी, जाणून घ्या खास टिप्स

4. फाटलेल्या ओठांवर रोज 2 ते 3 वेळा मध लावावे. रात्री झोपण्याआधीही ओठांना मध लावल्यानेही ते मुलायम होतील.

5. मोहरीच्या तेलानेही कोरडे पडलेले ओठ मुलायम राहण्यास मदत होते.

हिवाळ्यात आपल्या चेह-याप्रमाणे आपल्या ओठांवरही थंडीचा परिणाम दिसायला सुरुवात होते. त्यामुळे वर सांगितलेल्या झटपट घरगुती उपायांनी आपण ओठांचा कोरडेपणा दूर होतो.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)