थंडीत कशा पद्धतीचा मेकअप कराल; मेकअप आर्टिस्ट विनायक वरदे यांच्याकडून माहित करून घ्या काही खास टिप्स
Make Up (Photo Credits: Facebook)

दरवर्षी साधारण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबरपासून गुलाबी थंडी पडायला सुरुवात होते. थंडीत त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर पांढरी होणे,रुक्ष होणे यांसारखे अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी या थंडीत कशा पद्धतीचा मेकअप केला पाहिजे असा प्रश्न महिलावर्ग तसेच तरुणींना पडलेला असतो. कारण मेकअप करताना चेहरा उजळ दिसावा म्हणून चेह-यावर लावण्यात येणारी सौंदर्यप्रसाधने (कॉम्पॅक्ट, फाऊंडेशन, पॅनकेक इ.) यांचे प्रमाण किती कसे ठेवावा असा प्रश्न महिलांना पडलेला असतो. कारण चेह-यावर नेहमीप्रमाणे जास्त मेकअप केल्यास थंडीत तो मेकअप फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे चेह-यावर पांढरे पांढरे डागही दिसायला लागतात.

तमाम महिलावर्गाला आणि तरुणींना पडणा-या प्रश्नाविषयी आम्ही मेकअप आर्टिस्ट-हेअर स्टायलिस्ट विनायक वरदे (Make Up Artist Vinayak Varde) यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी लेटेस्टली मराठीशी बोलताना त्यांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या.

विनायक यांच्या म्हणण्यानुसार, थंडी हा असा ऋतू आहे की ज्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेकअप चेह-यासाठी चांगला असतो. मात्र कोणताही मेकअप करण्यापूर्वी तुम्हाला चेह-याला मॉयश्चरायजर लावणे बंधनकारक आहे. तसेच चेह-यावर Primer लावणेही गरजेचे आहे. मॉयश्चरायझर मेडिकल सहज उपलब्ध होणारे Dosetel ही क्रीम उत्तम पर्याय आहे. तसेच Primer मध्ये तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पर्याय निवडू शकता.

हेही वाचा- Health Tips: थंडीत त्वचा कोरडी पडत असल्यास मदत करतील हे '5' झटपट उपाय

Primer हे एक प्रकारचे पारदर्शक लोशन असते. यामुळे तुमच्या चेह-यावर एक कृत्रिम थर येतो. ज्यामुळे सौंदर्यप्रसाधने वापरल्यानंतर तुमच्या चेह-यावर त्याचा काही दुष्परिणाम होत नाही. कारण स्त्रियांची त्वचा ही खूप संवेदशील आणि नाजूक असते. अशा स्त्रियांच्या चेह-यावर मेकअपमुळे पिंपल्स येतात किंवा त्वचा टॅन होण्याची शक्यता असते. अशा महिलांनी चेह-यावर मेकअप करण्याआधी प्रायमर लावल्यास त्या लेयरवर मेकअप केला जातो. ज्यामुळे चेह-याला काही हानी पोहोचत नाही. तसेच प्रायमर मुळे तुमच्या चेह-यावर घाम कमी येतो आणि मेकअप दीर्घकाळ टिकून राहतो.

जर तुमची त्वचा खूपच कोरडी पडत असेल तर तुम्हाला डॉसिटेल क्रीमचे प्रमाण थोडे वाढवावे लागेल असा सल्ला देखील विनायक वरदे यांनी दिला आहे. त्यामुळे कोणताही मेकअप करण्याआधी मॉयश्चरायझर नंतर प्रायमर लावावे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे मेकअप प्रोडक्ट्स जसे फाउंडेशन, कन्सीलर तुम्ही चेह-यावर लावू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही मॉयश्चरायझर चेह-यावर लावण्याआधी आपल्या हातावर लावून ते आपल्या त्वचेला स्यूट होत की नाही याची खात्री करुन घ्या मगच चेह-यावर लावा.

मेकअप काढताना क्लिंजिंग मिल्क ला आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनचे बेबी ऑईल. याचा वापर करुन तुम्ही आपल्या चेह-यावरील मेकअप अगदी सहजपणे काढू शकता. विनायक वरदे यांनी दिलेला हा सल्ला आणि आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे जरुर कळवा.