आपल्या देशात तुळशीच्या झाडाला धार्मिक आणि आयुर्वेदात फार अधिक महत्व आहे. हेच कारण आहे की प्रत्येकाच्या घरात आपल्याला तुळशीचे झाड दिसून येते. तुळशीचा उपयोग आरोग्या संबंधित विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी केला जाते. तुळशीच्या झाडात उपलब्ध असलेल्या औषधी गुणर्धमांमुळे आपण बहुतांश रोगांपासून दूर राहतो. रोज तुळशीची पाने खाल्लायस आरोग्य स्वस्थ राहते. या व्यतिरिक्त शरीरात कोणत्याही रोगाचे संक्रमण होण्यापासून आपला बचाव सुद्धा होतो.(Pomegranate Juice Benefits: फक्त रक्त वाढवण्यासाठी नाही तर अनेक गोष्टींवर उपयोगी आहे डाळिंबाचा रस; जाणून घ्या फायदे)
तुळशीची पाने शरीरातील सूज सुद्धा कमी करण्यास मदत करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुळशीच्या पानांपेक्षा त्याच्या बियांचा सुद्धा फार मोठा फायदा आपल्या आरोग्याला होतो. तुळशीच्या बियांचा वापर खुप वर्षांपासून घरगुती उपचारांमध्ये केला जातो. त्याचसोबत आयुर्वेदिक आणि चीनी उपचारात ही तुळशीच्या बिया वापरल्याचे दिसून येते. यामध्ये प्रोटीन, फायबर आणि लोह याचा स्तर सर्वाधिक असतो. तुळशीच्या बिया पाचन, वजन कमी करणे, खोकला किंवा थंडी भरुन येणे यासारख्या आजारांवर फायदेशीर ठरतात. या व्यतिरिक्त शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवण्यास तुळशीच्या बिया मदत करतात. तर जाणून घ्या तुळशीच्या बियांचे फायदे आणि त्याचा कशा प्रकारे वापर करतात.
-पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर
तुळशीच्या बिया पाचनतंत्र सुधरवण्यास मदत करतात. काही वेळेस लोकांना पोटासंबंधित समस्या उद्भवतात. जसे अॅसिडिटी किंवा अपचन त्यामुळे त्यांना बैचेन झाल्यासारखे त्यावेळी वाटते. मात्र तुळशीच्या बिया जर तुम्ही खाल्ल्यास त्यामधील फायबर हे आतड्यांची योग्य प्रकारे सफाई करतात. पाण्यात टाकून तुम्ही त्या बिया प्यायल्यास फायदेशीर ठरु शकते.
-तणावापासून दूर ठेवतात
तुळशीच्या बिया मेंदूवर उत्तम प्रभाव टाकतात. या बिया खाल्ल्यास तणाव आणि चिंता सारख्या समस्या काही प्रमाणात दूर होतात. तुळशीच्या बिया मानसिक आजारांपासून सुद्धा सुटका मिळवून देतात. खरंतर तणावात असताना काही जण विविध प्रकारची औषधे घेतात. परंतु जर तुम्ही हा घरगुती उपाय केल्यास तुम्हाला काही प्रमाणात बरे वाटेल.(Health tips: दुधात तूप टाकून पिल्याने होतात 'हे'अनेक फायदे ; वाचून तुम्हाला ही बसेल आश्चर्यचा धक्का)
-वजन कमी करण्यास होईल मदत
जर तुम्हाला तुमचे वजन वाढल्यासारखे वाटत असेल तर तुळशीच्या बियांचे सेवन करा. याचा तुम्हाला खरंच फायदा होऊ शकतो. कारण तुळशीच्या बियांमध्ये असलेल्या अॅन्टी इंफ्लामेट्री गुण ते तुमच्या शरीराची सूज कमी करतात. या व्यतिरिक्त तुम्हाला लूज मोशन होत असल्यास तरीही तुळशीच्या बिया फायदेशीर ठरतील.
दरम्यान तुळशीच्या बिया तुम्हाला सुज आल्यास किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतील. कारण बियांमध्ये असलेले गुण हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील.पण तुमचे आरोग्य सुद्धा दीर्घकाळापर्यंत स्वस्थ राहण्यास मदत होईल. Seeds
-