Pomegranate Juice Benefits: फक्त रक्त वाढवण्यासाठी नाही तर अनेक गोष्टींवर उपयोगी आहे डाळिंबाचा रस; जाणून घ्या फायदे
Photo Credit: pixabay

डाळिंब (Pomegranate ) कोणाला आवडत नाही. डाळिंबाची साल जितकी कठीण, तितकेच ते आतून मधुर आणि गोड फळ असते. जर एखाद्या व्यक्तीस कोणताही आजार झाला तर लोक प्रथम त्यांना डाळिंब घेण्याचा सल्ला देतात. कमकुवतपणापासून मुक्त होण्यासाठी किंवा उपचारानंतर आरोग्यासाठी फायदे मिळवण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्यास रुग्णाला सांगतात . डाळिंबाच्या वापरामुळे आपल्या आरोग्यास चांगले फायदे मिळतात परंतु डाळिंबाचे फायदे नक्की काय आहेत हे आपल्याला माहिती आहे का? नाही, ना? मग आजच्या लेखातून आपण जाणून घेऊयात डाळिंब किंवा डाळिंबाचा रस पिण्याचे फायदे. (Health Tips: दिवसाची सुरुवात जीरे आणि मेथीचे पाणी पिऊन केल्याने तुम्ही रहाल 'या' आजारांपासून दूर; जाणून घ्या फायदे )

  • डाळिंबाचा रस टेस्टोस्टेरॉन हार्मोन आणि शुक्राणूंची संख्या वाढवितो. यामुळे पुरुषांची फर्टिलिटी वाढते.
  • डाळिंबाच्या ज्यूस मध्ये ऑक्सीडेंट्स शिवाय विटामिन अणि मिनरल्स आहेत जे कमजोरी दूर करतात.
  • डाळिंबाच्या रसामध्ये भरपूर लोह आणि फॉलिक एसिड असतात. ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते
  • डाळिंबाच्या रसामध्ये असलेले पॉलीफेनल्स कर्करोगास कारणीभूत पेशींच्या वाढीस प्रतिबंधित करून कर्करोगाचा प्रतिबंध करतात.
  • डाळिंबाच्या रसामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहेत.
  • डाळिंबाच्या रसामध्ये असलेले पॉलिफेनल्स शरीरात चरबी जमा करण्यास प्रतिबंध करतात. लठ्ठपणा प्रतिबंधित आहे.
  • डाळिंबाचा रस शरीराला डिटॉक्स करतो. यामुळे यकृतावरील ओझे कमी होते. यकृत निरोगी राहतो.

    डाळिंबाचा रस हाडे मजबूत करते. सांध्यातील वेदना आणि सांधेदुखीचा त्रास टाळतो.

  • डाळिंबाच्या रसामध्ये असलेले पुणिक एसिड शरीरात मधुमेहाचा प्रतिकार सुधारते आणि मधुमेहापासून बचाव करते.

 

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)