भारतामध्ये आता अंध महिला त्यांच्या 'स्पर्शज्ञाना'ने ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णांमध्ये गाठीचे वेळीच परीक्षण करून देण्यात मदतीचा हात उचलत आहेत. यामुळे कॅन्सरच्या सुरूवातीच्या टप्प्यामध्येच या आजाराचे निदान सुरक्षित मार्गाने होण्यास मदत होत आहे. जर्मनी मधून त्याची सुरूवात झाली आणि आता भारतासह जगाच्या इतर देशातही अंध महिलांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. Medical Tactile Examiner असं या महिलांना संबोधलं जात आहे. त्यांना स्पर्शज्ञानाने अगदी लहानातील लहान गाठ देखील ओळखता येत आहे. नक्की वाचा: EasyCheck Breast: रक्ताच्या चाचणीतून ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणारी चाचणी आता भारतामध्ये उपलब्ध .
जर्मनी मध्ये Medical tactile examination ची सुरूवात Frank Hoffmann या स्त्रीरोगतज्ञांनी केली आहे. 2011 मध्ये "Discovering Hands" या मोहिमेअंतर्गत अंध महिलांना Medical Tactile Examiner बनण्यासाठी मदत केली जात आहे. Hoffmann यांनी DW शी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये आधी त्या कॅन्सरचं निदान करण्यासाठी मॅमोग्राफीचा वापर करत असल्याचं म्हणाल्या होत्या पण आता रुग्णांचं निदान या MTE द्वारा केलं जातं. हा पर्याय किफायतशीर आहेच पण त्यासोबतच रेडिएशनचा धोका देखील कमी झालेला आहे. हे स्पर्शज्ञानाने कॅन्सरची गाठ ओळखण्याबाबतची प्रक्रिया भारतासोबतच स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, कोलंबिया, मेक्सिको मध्येही पोहचलं आहे. भारतामध्ये National Association of the Blind India Centre for Blind Women and Disability Studies (NABCBW) कडून 2017 साली हा अभ्यासक्र सुरू करण्यात आला. त्यांच्याकडून 18 जणींना पूर्ण प्रशिक्षण देण्यात आलं आहे तर 8 जणांचा प्रशिक्षण सुरू आहे. भारतामध्ये त्यांच्याकडून 1 हजार पेक्षा अधिक महिलांचे प्रशिक्षण झाले आहे. 2019 च्या अहवालानुसार या एमटीई कडून करण्यात आलेले निदान आणि फिजिशियन कडुन करण्यात आलेले निदान यांचा आकडा सारखाच असल्याचं म्हटलं आहे.
महिलांना यामध्ये 9 महिन्यांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते तर 3 महिलांची मेडिकल इंटर्नशिप असते. प्रशिक्षणादरम्यान, त्यांना इंग्रजी, तसेच कम्प्युटर सायंस, मानवी शरीरशास्त्राची मूलभूत तत्त्वे आणि स्तनाच्या कर्करोगावर लक्ष केंद्रित करणारे शरीरशास्त्र शिकवले जाते. या महिला स्तनाच्या कर्करोगाचे प्रकार आणि स्त्रीरोग तज्ञ आणि कर्करोग तज्ञांनी दिलेल्या उपचार आणि उपचारांबद्दलही शिकतात.
Medical Tactile Examiner मॅमोग्राफीला पर्याय आहे?
ब्रेस्ट कॅन्सर मध्ये त्याचे निदान लवकर होणं गरजेचे आहे. जेव्हा गाठीचे निदान लवकर होते तेव्हा त्यावर मात करणं देखील अधिक शक्य असल्यांचं Mandeep Malhotra, director of Oncology at CK Birla Hospital सांगतात. मात्र भारतामध्ये सुमारे 60% ब्रेस्ट कॅन्सर हे तिसर्या, चौथ्या स्तरामध्ये समोर येतात. मात्र पाश्चात्य देशात ब्रेस्ट कॅन्सरचं निदान पहिल्या, दुसर्या टप्प्यातच होते. महिलांनी वर्षातून एकदा स्वतःची चाचणी करून घेणं आवश्यक आहे.
ब्रेस्ट टिश्यू हे अल्ट्रासाऊंड किंवा मॅमोग्राफीने तपासले जातात पण त्याला बंधनं आहे. तरूण मुलींमध्ये मॅमोग्राफी परिणामकारक नाही. तसेच 45 वर्षाखालील महिलांसाठी देखील ती सूचवली जात नाही. त्यामुळे भारतामध्ये या अंध महिलांच्या स्पर्शज्ञानाचा मोठा फायदा होणार आहे. MTE या मॅमोग्राम किंवा अल्ट्रासाऊंडला पर्याय नाही पण तंत्रज्ञानाला जोड नक्की देऊ शकतात.
संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार या MTE 6-8 mm इतक्या लहान देखील गाठी ओळखू शकत आहेत. या महिलांचा मिसिंग रेट 1% आहे तोच मॅमोग्राम्स मध्ये 20% आहे.