Tomato Flu In India: लॅन्सेटने नुकताच 'टोमॅटो फ्लू' (Tomato Flu) च्या बाबतीतही इशारा दिला आहे. या तापामुळे लहान मुलांमध्ये लालसर फोड आणि अंगावर मोठे पुरळ येतात. अशीच काही लक्षणे चिकुनगुनिया, डेंग्यू आणि मंकीपॉक्स (Monkeypox) संसर्गामध्येही दिसून येतात. शरीरावरील लाल फोडांमुळे त्याला 'टोमॅटो फ्लू' असे नाव देण्यात आले आहे. टोमॅटो फ्लूमध्ये थकवा, उलट्या, जुलाब, ताप, डिहायड्रेशन, सांधे सुजणे अशी लक्षणे दिसून येत आहेत.
टोमॅटो फ्लू म्हणजे काय?
कोविड-19 संकटानंतर आता भारतावर टोमॅटो फ्लूचे संकट ओढावले आहे. या तापाची लागण 5 वर्षांखालील मुलांना होत आहे. या तापात लहान मुलांना अंगावर फोड येत असून तज्ज्ञांनी या आजाराची तुलना मंकीपॉक्स आणि डेंग्यू, चिकनगुनियाशी केली आहे. हा ताप विषाणूजन्य संसर्ग आहे. या तापाचा पहिला रुग्ण केरळमध्ये 6 मे 2022 रोजी आढळून आला होता. शरीरावर लाल रंगाचे पुरळ असल्याने या तापाला 'टोमॅटो फिव्हर' असे नाव देण्यात आले आहे. याची लागण झाल्यावर मुलांना खूप ताप येतो. याशिवाय शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि सांधेदुखी खूप तीव्र होते. (हेही वाचा - Monkeypox Update: मानवापासून कुत्र्याला मंकीपॉक्स विषाणूचे संक्रमण; वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर WHO ने दिली चेतावणी)
टोमॅटो फ्लूची लक्षणे?
ताप आल्यावर शरीरात पाण्याची कमतरता, त्वचेवर लाल डाग आणि खाज सुटणे. याशिवाय, सुरुवातीच्या लक्षणांमध्ये उच्च ताप, सांधेदुखी, पोटदुखी आणि वेदना, मळमळ, उलट्या, खोकला, शिंका येणे यांचा समावेश असू शकतो. हा ताप विषाणूमुळे होतो. प्रौढांमध्ये या विषाणूशी लढण्याची क्षमता असते.
दरम्यान, पहिल्यांदा केरळमध्ये या विषाणूचे रुग्ण आढळून आले. अलीकडेच केरळ, आर्यनकावू आणि नेदुवाथुरमध्ये प्रकरणे निदर्शनास आल्यानंतर तामिळनाडू आणि कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. लॅन्सेटच्या अहवालानुसार, भुवनेश्वरमध्ये 26 मुलांना संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. 20 ऑगस्ट 2022 पर्यंत, केरळ, तामिळनाडू आणि ओडिशामध्ये या विषाणूचा प्रसार झाल्याचे आढळून आहे.