Cancer Awareness: शरीरात 'हे' संकेत असू शकतात कॅन्सरची लक्षणं; वेळीचं सावध व्हा
कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास शेवटच्या टप्प्यात एखाद्या व्यक्तीला या आजारापासून वाचविणे अवघड होते. कर्करोग झालेल्या रुग्णाच्या शरीरात काही संकेत दिसून येत असतात. या लक्षणांच्या आधारे आपण एखाद्याचे आयुष्य वाचवू शकता. कर्करोगाचे लक्षणं किंवा चिन्ह पाहिल्यानंतर आपण ताबडतोब डॉक्टरांना भेटलं पाहिजे.
Cancer Awareness: कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे (Cancer Symptoms) दुर्लक्ष केल्यास शेवटच्या टप्प्यात एखाद्या व्यक्तीला या आजारापासून वाचविणे अवघड होते. कर्करोग झालेल्या रुग्णाच्या शरीरात काही संकेत दिसून येत असतात. या लक्षणांच्या आधारे आपण एखाद्याचे आयुष्य वाचवू शकता. कर्करोगाचे लक्षणं किंवा चिन्ह पाहिल्यानंतर आपण ताबडतोब डॉक्टरांना भेटलं पाहिजे. कर्करोगावर प्राथमिक अवस्थेत उपचार केला जाऊ शकतो. कर्करोगाचे लक्षणं पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही दिसू शकतात. डिप्रेशन किंवा फ्लूमुळे भूक न लागल्याने एखाद्याचा मृत्यू होतो. कर्करोग आपल्या चयापचयवर परिणाम करतो. त्यामुळे पोट, स्वादुपिंड, मोठ्या आतड्यावर किंवा गर्भाशयावर कर्करोगाचा पोटात दबाव जाणवतो. ज्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. (हेही वाचा - No Shave November 2020 Meaning & Rules: ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ आणि 'मूव्हंबर' चा जगभरातील कर्करोगाच्या रुग्णांशी काय संबंध आहे? जाणून घ्या)
कर्करोगाची लक्षणं -
शौचास गेल्यानंतर रक्त पडणे, हे देखील कर्करोगाचे मोठे लक्षणं असू शकते. तथापि, अल्सर, मूळव्याधी असल्यासही हे रक्त पडण्याची समस्या निर्माण होते. मलद्वारे रक्तस्त्राव होत असेल तर गुदाशय किंवा आतड्याचा त्रास होऊ शकतो. रक्ताचा गडद रंग पोटातील अल्सर दर्शवितो. यासाठी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.
लघवी करताना रक्तस्त्राव होणे -
लघवीमध्ये रक्तस्त्राव होणे देखील कर्करोगाचे एक प्रमुख लक्षण आहे. हे मूत्रपिंड किंवा मूत्राशय कर्करोगाचे लक्षण असू शकते. तसेच किडनी स्टोन किंवा मूत्रपिंडाचा रोग असल्यासही अशी समस्या उद्धवण्याची शक्यता असते.
दीर्घकालीन खोकला -
जर आपल्याला बराच काळ खोकल्याचा त्रास जाणवत असेल आणि उपचारानंतरही आराम मिळाला नसेल, तर हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. फुफ्फुसांचा कर्करोगामुळे छातीत दुखणे, वजन कमी होणे, घसा खवखवणे, कंटाळा येणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे, अशी लक्षणं दिस शकतात. मात्र, कोल्ड फ्लूमध्येदेखील अशा स्वरुपाची लक्षण दिसून येतात. त्यामुळे याची वैद्यकीय चौकशी होणे आवश्यक आहे.
थकवा -
कर्करोग झालेल्या व्यक्तीला प्रचंड थकवा जाणवतो. हा थकवा सर्वसाधारण थकव्यापेक्षा वेगळा आहे. कारण, हा थकवा कधीही दूर होत नाही. जर आपल्याला शारीरिक क्रियेत असा बदल जाणवत असेल किंवा आपल्याला झोप लागत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
शरीराचे तापमान अचानक वाढणे -
संसर्ग किंवा फ्लूमध्ये शरीराचे तापमान लक्षणीय वाढते. एखाद्याला ताप येतो. परंतु, लिम्फोमा, ल्युकेमिया आणि मूत्रपिंड-यकृतच्या कर्करोगामध्येही रुग्णाला ही समस्या जाणवते. कर्करोगात, ताप अचानक वाढतो आणि दिवसा कमी होतो. जर शरीराचे तापमान 100.5 अंशांपेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.
घाम येणे -
रात्री घाम येणे देखील कर्करोगाचे एक मोठे लक्षणं आहे. तथापि, मध्यम वयाच्या स्त्रियांमध्ये, रजोनिवृत्तीमुळे अशा समस्या बर्याचदा उद्भवतात. परंतु, कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी तपासणी करुन घेणं आवश्यक आहे.
याशिवाय आपल्याला त्वचेत अचानक बदल जाणवत असेल तरीदेखील डॉक्टरांशी संपर्क साधा. चरबी, त्वचेचा रंग बदलणे किंवा शरीरातील भागाचा आकार खराब होणे हे देखील कर्करोगाचे लक्षणं असू शकते. एका अहवालानुसार, कर्करोग झालेले पाच पैकी दोन रुग्ण वजन कमी झाल्याची तक्रार करतात. तथापि, वजन कमी होण्याचे इतरही अनेक कारणे असू शकतात. परंतु, जर अचानक वजन कमी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2020 03:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

