भारतामध्ये CSIR कडून घेण्यात आलेल्या 40 संस्थांमधील सर्वेच्या आधारे करण्यात आलेल्या दाव्यात स्मोकर्स आणि शाकाहारी लोकांमध्ये कोरोना वायरसचा संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. Council of Scientific and Industrial Researchने नुकताच भारतभर सेरोसर्व्हे केला आहे. दरम्यान या सर्व्हे मध्ये देण्यात आलेल्या माहितीमध्ये ओ रक्तगटांच्या लोकांना देखील कोरोनाचा धोका कमी असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर बी आणि एबी रक्तगटाच्या लोकांमध्ये कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. नक्की वाचा: Coronavirus: 'या' रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त धोका; वाचा काय सांगतेय सर्वेक्षण.
दरम्यान या सर्व्हेमध्ये 10,427 व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. या व्यक्ती लॅब किंवा इन्स्टिट्युशन मध्ये काम करणार्या आणि त्यांच्या कुटुंबातील काही लोकं होती. या लोकांच्या शरीरात SARS-CoV-2 च्या अॅन्टिबॉडीज आहे का? हे तपासलं गेलं. The CSIR-Institute of Genomics आणि Integrative Biology (IGIB), Delhi यांच्या या सर्व्हेमध्ये 1058 जणांमध्ये म्हणजेच 10.14% लोकांमध्ये अॅन्टीबॉडीज आढळल्या.
मागील वर्षी जुलै महिन्यात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार स्मोकर्स म्हणजेच धुम्रपान करणार्या लोकांमध्ये कोविड 19 चा धोका अधिक होता. स्मोकिंग मुळे हातातून तोंडाकडे वायरसचे ट्रान्समिशन अधिक पटकन होते. दरम्यान तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्यांमध्ये यामुळे श्वसन मार्गातील इंफेक्शन अधिक वाढू शकते. मात्र CSIR च्या सर्वेनुसार, स्मोकर्सना त्याचाधोका कमी आहे. कोविड 19 हा प्रामुख्याने श्वसन मार्गावर हल्ला करत असला तरीही स्मोकिंग प्रोटेक्टिव्ह आहे.
दरम्यान ज्या व्यक्ती पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात त्यातही सिक्युरिटी, हाऊस किपिंग पर्सनल , नॉन स्मोकर्स आणि मांसाहारी असणार्यांमध्ये कोरोनाचा धोका अधिक आहे. तर सार्वजनिक वाहतूकीचा वापर करणारे आणि स्मोकर्स, शाकाहारी, ए, ओ रक्तगटाच्या व्यक्ती प्रोटेक्टिव्ह असल्याचं समोर आलं आहे.