Sputnik V | Image used for Representational purpose only | File Image

कोविड-19 (Covid-19) डेल्टा स्ट्रेन (Delta Strain) विरुद्ध रशियाची (Russia) स्पुटनिक व्ही (Sputnik V) लस 90 टक्के परिणामकारक असल्याची माहिती Novosibirsk State University's Laboratory चे अध्यक्ष आणि रशियन अॅकेडमी ऑफ सायन्सचे मेंबर Sergey Netesov यांनी दिली. युके, अमेरिका आणि इतर देशांमधून मिळालेल्या डेटानुसार, स्पुटनिक व्ही सारख्या mRNA  आणि व्हेक्टर व्हॅक्सिनस डेल्टा वेरिएंट विरुद्ध संरक्षण करु शकतात. आधीच्या वेरिएंट विरुद्ध 95% संरक्षण तर डेल्टा वेरिएंट विरुद्ध 90 % संरक्षण करण्यास ही लस सक्षम आहेत, असे Netesov म्हणाले.

आधीपासून बनवलेली लस विकसित करण्याची गरज नाही. ती आहे तशीच परिणामकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. स्पुटनिक व्ही लस कोविड-19 च्या डेल्टा वेरिएंट विरुद्ध 100 टक्के परिणामकारक असल्याची माहिती पॉप्युलेशन व्हेरियाबिलिटी मॅकेनिजम लॅबचे अध्यक्ष Vladimir Gushchin यांनी दिली आहे.

कोरोना व्हायरस विरुद्ध लस रजिस्टर करणारा रशिया हा पहिला देश ठरला. ऑगस्ट 2020 मध्ये स्पुटनिक व्ही चे रजिस्ट्रेशन केले होते. (Covishield, Covaxin आणि Sputnik V या कोविड-19 लसींमधील नेमका फरक काय? जाणून घ्या लसींची किंमत, डोसेसमधील अंतर आणि परिणाम)

The Lancet medical journal मध्ये पब्लिश झालेल्या अॅनालिसिसनुसार, स्पुटनिक व्ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. तर Gamaleya National Research Center of Epidemiology and Microbiology आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फर्म यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, स्पुटनिक व्ही 97.6 टक्के परिणामकारक आहे.

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सनप्रमाणे स्पुटनिक व्ही लस दिलेल्या कोणत्याही व्यक्तीला रक्तांच्या गुढळ्यांचे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. सध्या जगातील 60 पेक्षा अधिक देशांमध्ये स्पुटनिक व्ही वापरली जाते.