![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/08/employees-380x214.jpg)
हैदराबाद येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांशी कर्मचाऱ्यांना, लठ्ठपणा (Risk of Obesity) हृदयविकार (Heart Disease) आणि स्ट्रोक्सचा (Stroke) धोका अधिक असल्याचे आयसीएमआर-राष्ट्रीय पोषण संस्था, भारत (ICMR-National Institute of Nutrition, India) द्वारा एका अहवालात म्हटले आहे. आयटी क्षेत्रात काम करणारे बहुतांशी कर्मचारी नियमीत कामकाजाच्या दिवशी सरासरी 8 तासांपेक्षाही अधिक वेळ एकाच ठिकाणी बसलेले असतात. एकूण कर्मचाऱ्यांच्या केवळ 22% लोकच जाणीवपूर्वक हालचाली करतात. मात्र, या हालचालींचा वेगही आठवड्याला किमान 150 मिनीटे इतकाच आहे.
हैदराबादस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या संशोधकांनी म्हटले आपल्या अभ्यासात म्हटले आहे की, आयटी कर्मचार्यांपैकी बहुतेकांना त्यांची जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव आणि कामाच्या ठिकाणी अत्यंत तणावामुळे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात आणि इतर प्रकारचे असंसर्गजन्य रोग (NCDs) होण्याचा धोका उद्भवण्याीच शक्यता कैक पटींनी वाढते आहे.
एनआयएन द्वारे हैदराबाद येथील वय वर्षे 30 असलेल्या आयटी कर्मचारी आणि त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला. जो ऑगस्ट 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय पीअर रिव्ह्यूड जर्नल 'न्यूट्रिएंट्स' मध्ये प्रकाशित झाला आहे. या अहवालात म्हटले आहे की, अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या जवळपास 46% कर्मचाऱ्यांपैकी किमान तीन किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांना चयापचयाची समस्या होती. तर अनेकांना एचडीएल पातळीची कमतरता, उच्च कंबरेचा घेर आणि लठ्ठपणाची समस्या सतावते आहे.
एनआयएनचा सर्वे आल्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश पडला आहे. देशाच्या विकासात मोठ्या प्रमाणावर योगदान देणाऱ्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. साधारण 26 ते 35 वयोगटातील अनेक कर्मचाऱ्यांना शारीरिक पातळीवर अनेक जोखमींना दीर्घ कालावधीसाठी तोंड द्यावे लागते आहे, असाही हा अहवाल सांगतो.
ट्विट
#Hyderabad-based ICMR - National Institute of Nutrition (@ICMRNIN) reveals that a majority of IT employees in Hyderabad carry the risk of developing heart diseases, blood pressure, diabetes, strokes, and other kinds of Non-Communicable Diseases (NCDs) because of their lifestyle. pic.twitter.com/6SoYgy6M6q
— All India Radio News (@airnewsalerts) August 19, 2023
दरम्यान, संशोधकांच्या अभ्यासात असे दिसून आले की, सुमारे एकूण सहभागींगपैकी 50% सहभागींना (183 पैकी) मेटाबॉलिक सिंड्रोम (MetS) होते ज्यामुळे NCDs होऊ शकतात. MetS मध्ये आढळून आले की, पुरुषांमध्ये कंबरेचा घेर 90 सेमी किंवा त्याहून अधिक आढळून आला. यात हे प्रमाण स्त्रियांमध्येही आढळून आले. ज्यामध्ये काही महिला कर्मचाऱ्यांच्या कंबरेचा घेर 80 सेमी किंवा त्याहून अधिक आढळून आला. या कर्मचाऱ्यांमध्ये ट्रायग्लिसराइड्स (TG) पातळी 150 mg/dL किंवा त्याहून अधिक होती.